व्होडाफोनचा नवा धमाका, अनलिमिटेड कॉलबरोबर ८४ जीबी डाटा ऑफर
रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.
मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.
या योजनेनुसार कंपनीने फस्ट रिचार्ज (FR)४४५ अशा नावाने लॉन्च केलाय. या ऑफरनुसार ८४ दिवस मिळणार आहेत. ज्यांच्याकडे ४ जी हॅण्डसेट नाही त्यांना २ जीबी डाटासोबत मोफत लोकल आणि एसटीडी कॉल्सची लाभ मिळणार आहे. त्यांच्यासाठी ही ऑफर ३५ दिवसांसाठी असणार आहे.
भारतातील व्होडाफोनचे बिझनेस हेड आशीच चंद्रा यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ही सेवा आहे. सध्या व्होडाफोनने आपल्या पोस्टपेड आणि प्रीप्रेड ग्राहकांसाठी ७ रुपयांचा प्लान आणला आहे. SuperHour असे नाव आहे. या योजनेनुसार ग्राहकांना मर्यादीत काळासाठी लाभ मिळेल. या योजनेनुसार फ्री व्होडाफोन टू व्होडाफोन लोकल कॉल आणि अनलिमिटेड ४ जी आणि ३ जी ऑफर देण्यात आलेय.