वोडाफोनने लॉन्च केले फ्री वायफाय शेल्टर...
वोडाफोन इंडियाने फ्री वायफाय शेल्टर लॉन्च केले आहे.
नवी दिल्ली : वोडाफोन इंडियाने फ्री वायफाय युक्त बस शेल्टर लॉन्च केले आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
या सुविधेचा फायदा घेत युजर्स रोज २० मिनिटांपर्यंत कॉम्प्लीमेंटरी वायफाय वापरू शकतात. विशेष म्हणजे यासाठी तुम्ही वोडाफोन युजर असणे गरजेचे नाही. इतर भारतीय टेलीकॉम ऑपरेटर युजर्स देखील या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
या बस शेल्टरचे उद्घाटन वोडाफोन दिल्ली-एनसीआरचे बिजनेस हेड आलोक वर्मा यांनी केले. या प्रसंगी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१७ चे कांस्य पदक विजेता गौरव बिधुरी देखील उपस्थित होते.
काय म्हणाले वर्मा ?
या डिजिटल इनोव्हेशनबद्दल वर्मा म्हणाले की, वोडाफोन संपुर्ण नोएडाला स्मार्टसिटी बनवण्यासाठी योगदान देत आहे. शहरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय इंटरनेट सेवा उपलब्ध होत असल्याचा मला आनंद आहे. आम्ही नेटवर्कच्या माध्यमातून अशी कनेक्टेड सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करू ज्यामुळे सगळे एकमेकांशी जोडलेले राहतील.