-मुंबई : सोशल वेबसाईट फेसबुक सध्या आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलाय. पण, या फेसबुक पेजवर कुणाची नजर आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणी चोरून तुमच्या प्रोफाईलला भेट देतंय का? किंवा आत्तापर्यंत तुमच्या पेजला कुणी कुणी भेट दिलीय? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील... तर आम्ही हे शोधून काढण्याचा सोप्पा मार्ग तुम्हाला सांगतोय. 


असं शोधून काढा... 


- यासाठी तुम्हाला एक गुगल क्रोमची गरज असेल...


- गुगल क्रोम टॅब उघडून क्रोमच्या अॅड्रेस बारच्या उजव्या बाजुला दिसणाऱ्या तीन टिंबांवर क्लिक करा



 


- आता सेटिंगवर क्लिक करा


- त्यानंतर डाव्या बाजुला दिसणाऱ्या Extensions वर जाऊन Get More Extension वर क्लिक करा.


- त्यानंतर Flatbook सर्च करून हे एक्सटेन्शन वर add to chrome करा



 


- त्यानंतर तुमचं फेसबुकपेज रिफ्रेश करा...  


- तुम्हाला new theme मिळेल...इथे तुम्हाला प्रोफाईल व्हिजिटरची लिस्ट मिळेल.



 


- मग, पाहा कुणी कुणी दिलीय तुमच्या फेसबुक प्रोफाईलला भेट!