नवी दिल्ली : इंस्टाग्रामने युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे. हे फिचर तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये अॅक्टिव्हिटी नावाने दिसेल. हे फिचर अगदी फेसबुक आणि व्हॉट्सअॅप्रमाणे काम करेल. या फिचरच्या माध्यमातून तुम्ही ज्या युजर्संना फॉलो करता किंवा ज्या युजर्संना मेसेज पाठवायचे आहे, त्यांचा अॅक्टिव्हिटीचा कालावधी तुम्ही अॅपवर पाहु शकता. मात्र तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस इतरांना दिसू नये, असे तर यासाठीही एक उपाय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी तुम्हाला तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस बंद करावे लागेल. मात्र यामुळे तुम्ही इतरांचेही अॅक्टिव्हिटी स्टेटस पाहु शकणार नाही. तर जाणून घ्या इंस्टाग्रामवर हे अॅक्टिव्हिटी स्टेटस केस ऑफ कराल...


  • आपल्या डिव्हाईसवर जावून इंस्टाग्राम अॅपवर टॅप करा. यावेळी तुमचे अकाऊंट लॉग इन असणे गरजेचे आहे. 

  • तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा.

  • तुमच्या प्रोफाईल पेजवर जावून वर दिसत असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

  • एक पेज ओपन होईल. येथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. त्यात Show Activity Status वर क्लिक करा.

  • Show Activity Status बाय डिफॉल्ट ऑन राहिल. हे डिसेबल केल्यानंतर तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस कोणालाही दिसणार नाही.