मुंबई : व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप आज तरूणांपासून वृद्धांपर्यंत सार्‍यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सवर तुमच्या मित्रांचे जितके ग्रुप असतील तितकेच तुमच्या कुटुंबांचेही आहेत. त्यामुळे सतत व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज येतच असतात. व्हॉट्स अ‍ॅपवर येणारे अनेक मेसेज हे फॉरवड केलेलेच मेसेज असतात. त्यामुळे त्यांचा भडिमार नकोसा वाटतो. अशावेळेस केवळ ठराविक लोकांसोबत बोलण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपची सोय असावी असे तुम्हांला नक्कीच वाटले असेल. 


सध्या व्हॉट्स अ‍ॅपमध्ये एका क्रमांकावर एकच व्हॉट्स अ‍ॅप वापरता असतो. तुमचा ड्युएल फोन असला तरीही एकाच नंबरवर व्हॉट्स अ‍ॅप पाहता येतो. पण काही फोन त्याला अपवाद आहेत हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 
सॅमसंग जे, लिनोव्हो p2,शिओमी या फोनमध्ये तुम्हांला दोन नंबरसाठी व्हॉट्स अ‍ॅप वापरण्याची सोय आहे. 


नुकतीच शिओमीच्या फोन्सची विक्रमी विक्री झाली आहे. शिओमीच्या हँडसेटमध्ये ‘ड्युअल अॅप सपोर्ट’ हे फीचर आहे. यामुळे तुम्हांला एकाच वेळेस दोन क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅप वापरता येणार आहे. 


तुमच्याकडे ड्युअल अॅप सपोर्ट’फीचरचे फोन नसतील तर ‘Parallel Space app’ या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करूनदेखील दोन व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट्स चालवणं शक्य आहे. 
‘Parallel Space app’ प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.