नवी दिल्ली : मोबाईल फोनमधील बॅटरी गरम होऊन फुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वात अगोदर नोकियाच्या फिचर फोनमध्ये बॅटरी फुटल्याचीघटना घडली होती. त्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक स्मार्टफोनमध्ये बॅटरी गरम होऊन फुटल्याच्या लहान मोठ्या घटना घडल्या आहेत. राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वी मोबाईल ब्लास्टमुळे झाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. मानवी जीवनात मोबाईल फोन हा अतिशय गरजेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर मोबाईल फोन वापरताना काय काळजी घेतली पाहिजे? याची माहिती असणे गरजेचे आहे. सध्या मोबाईल फोनच्या वापरात वाढ होते आहे. मोबाईल फोन आपल्यासाठी घातक ठरु नये, यासाठी पाहूयात मोबाईल फोन ब्लास्ट होण्यामागची कारणे.


 लक्षणे-


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- फोनची स्क्रिन धूसर होणे किंवा स्क्रिनमध्ये अति गडदपणा येणे.
- मोबाइलफोन वारंवार हँग होणे
- फोनवर बोलत असताना फोन अधिक प्रमाणात गरम होणे. 



  
बॅटरीची तपासणी करा -



जर आपल्याकडे फोनची बॅटरी काढून टाकण्याचा पर्याय असेल तर बॅटरी टेबलवर ठेवा. यानंतर ती फिरवा आणि बॅटरी फुगली आहे का ते पाहा. जर बॅटरी वेगाने फिरत असेल तर त्याचा वापर करणे थांबवा. इनबिल्ट बॅटरी असलेल्या स्मार्टफोनची केवळ उष्णताच ओळखता येते. जर फोन गरम होत असेल तर तपासणी करा. स्मार्टफोनमध्ये २० टक्के चार्जिंग असतानाच फोन चार्ज करा. स्मार्टफोनमधील चार्जिंग पूर्ण संपण्याअगोदरच फोन चार्जिंगला लावा. बॅटरी पूर्ण संपल्यानंतर अधिक वीजपुरवठा लागतो. त्यामुळे बॅटरी ब्लास्ट होण्याची शक्यता जास्त असते.