मुंबई : भारतात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या हॉटस्पॉटचा वापर ही वाढला आहे. जेथे इंटरनेटच्या चांगल्या सुविधा नाहीत. तेथे मोबाईलच्या हॉटस्पॉटचा वापर हा कॉमन झाला आहे. पण यामुळे काही नुकसान देखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही अनेक दिवसांपासून मोबाईलचा हॉटस्पॉट वापरत असाल तर यामुळे तुमच्या डेटाच लवकर संपत नाही तर मोबाईल फोनची बॅटरी देखील लवकर संपते. त्यामुळे मोबाईल हॉटस्पॉट वापरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.


मोबाईल हॉटस्पॉटचा वापर करतान इतर अॅप बंद ठेवा. जे मोबाईलच्या बॅकग्राऊंडमध्ये सुरु असतात. ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. उदा. लोकेशन बंद ठेवा, स्क्रीन ब्राइटनेस कमी करा, नोटिफिकेशन टर्न ऑफ करा. मोबाईलला पावर सेविंग मोडवर टाका. 


हॉटस्पॉट काम झाल्यानंतर बंद केलं पाहिजे. काही लोकं विसरुन जातात. त्यामुळे तुमच्या बॅटरीवर परिणाम होईल. इतर लोकं ही हॉटस्पॉट कनेक्ट करण्याचा प्रयत्न करु शकतात. 


मोबाईल हॉटस्पॉटने वायफाय पेक्षा कमी स्पीड मिळते. जेथे ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध आहे. तेथे त्याचा वापर केला पाहिजे.


मोबाईल बेस्ड हॉटस्पॉटचा वापर जास्त वेळ करु नका. वाय-फाय आणि ब्रॉडबँडपेक्षा ते महाग असतं.