मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपहे सर्वात लोकप्रिय चॅटिंग ऍप आहे. जे भारतातच नाही तर जगभरात देखील खूपच लोकप्रिय आहे. मॅसेज करण्यापासून ते फोटो, डॉक्युमेंट पाठवण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीं व्हॉट्सअ‍ॅपमुळे सोप्या झाल्या आहेत. कंपनी देखील आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स आणच असते. ज्यामुळे युजर्स दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मकडे वळणार नाही. परंतु आता व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांनी त्याला मोठा दणका दिला आहे. पण नक्की असं काय घडलं? चला समजून घेऊ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वाढवण्यासाठी WhatsApp मर्यादित कालावधीसाठी युजर्सनां कॅशबॅक देत होते, कंपनीकडून मागे घेण्यात आले. जूनमध्ये यूजर्सना 105 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जात होती. परंतु आता अचानक कॅशबॅक बंद झाल्याने व्हॉट्सअ‍ॅपची ही पद्धत त्याच्या वापरकर्त्यांना आवडली नाही.


अशा परिस्थितीत, मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून UPI ​करणे बंद केले आणि इतर प्लॅटफॉर्मवर शिफ्ट झाले. यामुळे जुलैमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या UPI व्यवहारांमध्ये मोठी घट झाली होती.


NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ही संख्या 6.18 लाखांवर आली आहे, जी जूनमध्ये सुमारे 23 दशलक्ष होती. मात्र, यादरम्यान व्हॉट्सअ‍ॅपची एक दिलासादायक बातमी आहे. अ‍ॅपवरील UPI व्यवहारांचे मूल्य जुलैमध्ये वाढून ५०२ कोटी झाले, जे मागील महिन्यात ४२९.०६ कोटी होते.


व्हॉट्सअ‍ॅपकडून आणखी एक नवीन फीचर्स लाँच


व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन काही नवीन फीचर्स सादर करणार आहे. या वैशिष्ट्यांअंतर्गत, तुम्ही आता तुमचा ऑनलाइन स्टेटस इंडिकेटर लपवू शकाल. याचा अर्थ आता तुम्ही ऑनलाइन आहात की नाही हे कोणालाही कळणार नाही. या फीचर अंतर्गत, आता तेच वापरकर्ते तुम्हाला ऑनलाइन पाहू शकतील ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा ऑनलाइन स्टेटस इंडिकेटर शेअर करू इच्छिता. हे वैशिष्ट्य या महिन्यात वापरकर्त्यांसाठी सुरु केले जाऊ शकते.


तसेच व्हॉट्सअ‍ॅपचे दुसरे फीचर म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स यापुढे व्हॉट्सअ‍ॅप व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप व्ह्यू वन्स हे एक वैशिष्ट्य आहे जे वापरकर्ते एकदाच पाहू शकतात आणि नंतर ते अदृश्य होते. मात्र, या संदेशाचा स्क्रीनशॉट घेता येत होता, ज्यामुळे या फीचरचा पाहिजे तसा प्रायवसीसाठी उपयोग होत नव्हता. म्हणून आता कंपनी नवीन फीचर अंतर्गत या मेसेजचा स्क्रीनशॉट घेणं बंद करणार आहे.