मुंबई  : ऐन दिवाळी सुरु असताना व्हॉट्सअ‍ॅप डाऊन (Whatsapp Down) झाल्याने नेटकऱ्यांचा संताप झाला होता. मात्र अखेर जवळपास 2 तासांच्या खोळंब्यानंतप व्हॉट्सअ‍ॅप पूर्ववत झालंय. व्हॉट्सअ‍ॅप गंडल्याने नेटकऱ्यांनी आपला मोर्चा ट्विटरवर (Twitter) वळवला होता. ट्विट करत नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याने हैराण झालं होते. तर कुणी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याने मीम्स (Whtsapp Down Memes) शेअर करत त्याचा आनंद घेत होते. मात्र मेटा (Meta) कंपनीने लवकरात लवकर व्हॉट्सअ‍ॅप सेवा पूर्ववत करण्याचा दिलेला शब्द  पूर्ण केलाय. (whatsapp again started after 1 hours 45 minitues stop due t techniqual erorr netizens are happy)


अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयातील कामांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याने एकूण सर्वांचीच गैरसोय झालीय. दुपारी 12.30 च्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप गंडलं. अनेकांनी आधी मोबाईल स्वीच ऑफ-ऑन करुन पाहिलं. काहींनी इंटरनेट डेटा ऑफ-ऑन करुन पाहिला. मात्र तब्बल 1 तास 45 मिनिटं वाट पाहिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अखेर सुरु झालंय.