नवी दिल्ली : तुम्ही जर तुमच्या आयफोनमध्ये अॅपलचे लेटेस्ट सॉफ्टवेअर iOS 11 इंस्टॉल केले असेल आणि व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. खरंतर व्हॉट्सअॅप स्वाईप करून बंद न करण्याचा सल्ला कंपनीने युजर्सला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन X सोडल्यास बाकी सगळ्या आयफोनमध्ये होमबटनावर डबल क्लिक करून अॅप बंद करण्यासाठी स्वाईप करावे लागते. मात्र व्हॉट्सअॅप युजर्सने असे करणे टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे. कंपनीनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जर व्हॉट्सअॅप अशाप्रकारे बंद केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाहीत.


खरंतर अॅप बंद करण्याचा दुसराही कोणताही मार्ग नाही. एका युजरने अॅपल सपोर्ट आणि व्हॉट्सअॅपची ही समस्या ट्विट करून व्यक्त केली. मात्र असे बोलले जात आहे की, आयओएस ११ अपडेट झाल्यानंतर ही समस्या उद्भवू लागली. युजर्सची ही समस्या पुढच्या अपडेट मध्ये कंपनी दूर करू शकेल.  


iOS ११ डिव्हाईस अपडेट झाल्यानंतर युजर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. यापूर्वी बॅटरी ड्रेनच्या समस्येने युजर्स त्रासले होते.