मुंबई : फेसबुकच्या मालकीच्या WhatsAppने आपल्या यूजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. वापरकर्त्यांना अखंड आणि आश्चर्यकारक चॅटिंग अनुभव देण्यासाठी कंपनी आपल्या अ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स आणत असते. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन वैशिष्ट्ये आली आहेत, त्यापैकी दोन व्हॉट्स अ‍ॅप आणि एक व्हॉट्सअॅप वेबसाठी आहे. दिवाळीपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप कोणते फीचर्स ऑफर करत आहे आणि ते तुमच्यासाठी किती फायदेशीर आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


डेस्कटॉप फोटो Editor


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WhatsAppने या वैशिष्ट्याच्या रूपात डेस्कटॉप फोटो एडिटर सादर केले आहे, जे एक आवश्यक वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना डेस्कटॉप अ‍ॅपच्या मदतीने फोटो पाठवण्यापूर्वी एडिट करण्याचा पर्याय देते. पूर्वी हे काम पेंट किंवा इतर कोणत्याही एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने करावे लागत होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरच्या मदतीने यूजर्स स्टिकर्सही अ‍ॅड करू शकतात. आतापर्यंत ही सुविधा फक्त फोनवर उपलब्ध होती.


Link Previews


कोणतीही ऑनलाइन लिंक पाठवून तुम्ही समोरील व्यक्तीसोबत संभाषण सुरू करु शकता; लोकांना त्यांच्या मित्रांशी ते ऑनलाइन काय वाचतात, पाहतात आणि ऐकतात याबद्दल बोलायला आवडते. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या चॅटिंग दरम्यान दिसणार्‍या लिंकचे प्रीव्यू करण्याचा पर्याय बदलला आहे. वापरकर्ते आता संपूर्ण लिंक प्रीव्यू पाहण्यास सक्षम असतील. तसेच, जेव्हा वापरकर्ते नवीन लिंक प्राप्त करतील किंवा पाठवतील तेव्हा त्यांना पूर्वीपेक्षा अधिक जास्त कंटेंट दिसेल.


स्टिकर Suggestions


WhatsApp चॅट दरम्यान स्टिकर्स वापरण्यासाठी, तुम्हाला वापरायचे असलेले योग्य स्टिकर शोधण्यासाठी तुम्हाला साधारणपणे अनेक टॅबमधून जावे लागते. हे काहीवेळा तुमचे कनवर्जेशन लांबनीवर टाकते, किंवा यामुळे खूप वेळ वाया जातो, तर काहीवेळा तुम्ही शोधत असलेले स्टिकर तुम्हाला लगेच सापडत नाही. परंतु आता WhatsAppचे हे फीचर आणल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना आता चॅटिंगदरम्यान स्टिकर्सचे Suggestions मिळणार आहे. ज्यामुळे चॅटींग एक्पिरियन्स खूप चांगलं होणार आहे.


हे तुम्हाला परफेक्ट स्टिकर वापरण्यास Suggestions देईल. याचा वापरकर्त्यांच्या चॅटिंगच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही. आता नवीन फीचर्स आल्यानंतर युजर्सना अशी कोणतीही अडचण येणार नाही. कंपनीचा दावा आहे की त्यांनी हे वैशिष्ट्य गोपनीयतेला लक्षात घेऊन तयार केले आहे आणि WhatsApp वापरकर्त्यांचे सर्चेस पाहू शकत नाही आणि त्यांचे वैयक्तिक संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत.