WhatsApp मध्ये नवं फीचर, अॅप न उघडता करू शकता चॅटिंग
ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचा देखील नवा पर्याय
मुंबई : व्हॅट्सअॅप न ओपन करता आता तुम्ही चॅटिंग करू शकणार आहात. आणि आता हे शक्य झालं आहे नव्या एका फिचरमुळे. फेसबुकच्या F8 कॉन्फ्रेंसमध्ये व्हॅट्सअॅपने युझर्ससाठी नवीन फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये ग्रुप व्हिडिओ कॉलिंग असून स्टिकर्सचा देखील सहभाग झाला आहे. आता इंस्टेंट मॅसेजिंग व्हॅट्सअॅपने नवीन वेब डोमेन देखील सादर केला आहे. व्हॅट्सअॅपने नवीन डोमेन wa.me रजिस्टर्ड केलं आहे. आणि एंड्रॉयड वर्झन 2.18.138 हे अपर वर्झन डिवाइसेज काम करत आहे.
फोन नंबर टाकून चॅटिंग करू शकता
WA Beta इंफोच्या एका रिपोर्टनुसार, व्हॅट्सअॅपने wa.me नावाच्या डोमेनमध्ये रजिस्टर केलं आहे. ज्यामध्ये api.whatsapp.com अशी शॉर्ट लिंक आङे. ही लिंक चॅट ओपन करण्यासाठी वापरू शकतात.
असं काम करतं हे फीचर
कोणत्याही व्हॅट्सअप चॅटला ब्राऊजरवर ओपन करण्यासाठी युझर्सला https://wa.me/country extension + (phone number)टाइप करावा लागणार आहे. जर तुम्ही इनव्हॅलिड फोन नंबर टाकला तर चॅट ओफन होणार नाही. यावेळी तुम्हाला Phone Number Shared Via URL is Invalid असा मॅसेज येईल.
ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचं नवं फीचर
फेसबुकच्या इंस्टेंट मॅसेजिंग सर्व्हिस व्हॅट्सअॅपमध्ये लवकरच व्हिडिओ कॉलिंग फिचर देखील मिळणार आहे. कंपनी जानेवारी महिन्यापासून हे नवं फीचर लागू केलं आहे. व्हॅट्सअॅप स्टेटसवर जगभरात 450 मिलियन लोक वापर करतात. व्हॅट्सअॅपने ग्रुप अॅडमिन हे नवं फिचर जाहीर केलं आहे.