मुंबई : Whatsapp लवकरच Forward मेसेजमध्ये सुधारणा आणणार आहे. त्याची पहिली झलक बीटा अपडेटमध्ये दिसली आहे. सध्या हे फीचर विकासाच्या वाट्यावर आहे, जे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो. एका रिपोर्टनुसार, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करताना कॅप्शन लिहिण्याची सुविधा लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Wabetainfo च्या लेटेस्ट अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की WhatsApp लवकरच आणखी एक उपयुक्त मेसेजिंग फीचर घेऊन येत आहे. WhatsApp beta for Android 2.22.23.4 अपडेटसाठी WhatsApp बीटामध्ये या फीचरची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. रिपोर्टनुसार, आता यूजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो, व्हिडिओ, GIF आणि डॉक्युमेंट शेअर करताना कॅप्शन लिहू शकतील.


रिपोर्टमध्ये या फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये नवीन इंटरफेस दिसला आहे. नवीन अपडेटनंतर, जेव्हा यूजर्स मीडिया फाइल शेअर करतात, तेव्हा त्यांना कॅप्शन लिहिण्यासाठी एक कॉलम मिळेल. यामध्ये तो फोटो आणि व्हिडिओशी संबंधित कोणतेही कॅप्शन किंवा संदेश पाठवू शकतो. याशिवाय, तुम्ही कॅप्शन न लिहिता मेसेज फॉरवर्ड करू शकता.


सध्या हे फीचर विकासाच्या वाट्यावर आहे, जे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो.


व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नवीन फीचर्सची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. यात पोल, अवतार, एडिट, व्हॉईस स्टेटस अपडेट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. अवतार फीचर अंतर्गत यूजर्स त्यांचा अवतार तयार करू शकतात आणि केवळ मित्रांना स्टिकर्स पाठवू शकत नाहीत तर प्रोफाइल फोटोवर त्यांचा अवतार देखील अपलोड करु शकतात.