मुंबई : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. मात्र, कामाच्यावेळी फोन बाजुला ठेवावा लागतो. मात्र, असे असले तरी संगणक आणि लॅपटॉपवर काम करताना व्हॉट्सअ‍ॅप पाहता येते.  यासाठी फोनची आवश्यकता लागते. आता या फोनचीही गरज भासणार नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp)एक उत्तम अपडेट येत आहे. संगणकावर व्हॉट्सअॅप चालवत असताना, आपल्याला यापुढे फोनवर पुन्हा कनेक्ट करावे लागणार नाही. एकदा आपण लॉगिन केले की आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर सतत चॅटिंग करण्यास सक्षम असाल. (WhatsApp is bringing fun features, now the app will be available without connecting to the phone)


नवीन फीचर येणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाइट zeenews.com च्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. यात नवीन वैशिष्ट्य असणार आहे. संगणकाच्या माध्यमातून गप्पा मारताना आपल्याला ते वारंवार मोबाइलशी कनेक्ट करण्याची आवश्यकता नाही. अहवालानुसार व्हॉट्सअॅप या नव्या फीचरवर काम करत आहे. दरम्यान, या नवीन वैशिष्ट्याची बीटा आवृत्ती सज्ज आहे.


कसे कार्य करेल


मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईलवरून संगणकात  व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) लॉग इन करताना वापरकर्त्यांना नवीन डिव्हाइस जोडण्यास सांगितले जाईल. एकदा स्वीकारल्यानंतर वापरकर्त्यास पुन्हा पुन्हा लॉगिन करण्यास सांगितले जाणार नाही.


सेटिंग्ज मेनूमध्ये देखील पर्याय उपलब्ध


या अहवालात असे म्हटले आहे की, कोणत्याही नवीन उपकरणातून व्हॉट्सअॅपवर प्रवेश करण्यासाठी सेटिंग्जमध्ये एक खास पर्याय देण्यात येईल. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सना एकाच वेळी devices कनेक्ट करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.