मुंबई: संवादाचं सर्वात मोठं माध्यम म्हणजे Whatsapp अगदी ऑफिसपासून ते गप्पा मारण्यापर्यंत सर्व गोष्टी आपण या एपवर करत असतो. Whatsapp आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स लाँच करत असतं. ज्याचा फायदा युझर्सना नेहमीच होत असतो. Whatsapp आता व्हॉइस मेसेजमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाच्या ठिकाणी किंवा कॉलेजसाठी व्हॉइस मेसेज वापरण्याचं प्रमाण बऱ्याचदा अधिक असतं. बऱ्याचवेळा चुकीचा व्हॉइस मेसेज पाठवला जातो किंवा चुकून पाठवला जातो. अशावेळी तो डिलीट ऑल पर्याय निवडावा लागतो. मात्र आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. कारण या चुका होऊ नयेत म्हणून Whatsapp कडून एक नवीन फीचर आणलं जात आहे.


Whatsappने या फीचरचं टेस्टींग पूर्ण केलं असून लवकरच युझर्सना हे अपडेट फीचर वापरण्यासाठी मिळणार आहे. या फीचरमध्ये युझर्सना व्हॉइस मेसेज पाठवण्याआधी तो पुन्हा एकदा तुम्हाला व्हॉइस मेसेज ऐकवणार आहे. त्यानंतर तो पाठवण्याचा पर्याय दाखवणार आहे. थोडक्यात तुम्ही व्हॉइस मेसेज आता थेट पाठवू शकत नाही. तर तो रेकॉर्ड केल्यावर तुम्हाला ऐकून मगच पाठवता येणार आहे. 


हे फीचर अॅण्ड्रॉइड आणि बिटासाठी टेस्ट करण्यात आलं असून लवकरच युझर्सला वापरता येणार आहे. याआधी व्हॉइस मेसेज हा वेगवेगळ्या स्पीडमध्ये तुम्ही ऐकू शकत होतात असं फीचर Whatsapp कडून आणण्यात आलं होतं. आता हे फीचर आलं तर युझर्सला खूप फायदा होणार आहे. 


रिअल टाइम व्हॉइस वेबफॉर्म शिवाय नवीन Whatsapp स्टॉप बटण देखील युझर्सला मिळणार आहे. यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करत असाल तर तुम्हाला आता ते मध्येच थांबवता येणार आहे आणि पुन्हा रेकॉर्डही करता येणार आहे. तुम्हाला जर हे रेकॉर्डिंग आवडलं नाही तर तुम्ही न पाठवता डिलीटही करू शकणार आहात.