WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनीकडून तीन नवीन फीचर्स जारी
WhatsApp आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे.
मुंबई : WhatsApp हा सर्वात लोकप्रिय चॅटिंग ऍपपैकी एक आहे. याचे जग भरातुन करोडो युजर्स आहेत. आपले युजर्स टिकवून ठेवण्यासाठी कंपनी काहीना काही नवीन फीचर आणण्याच्या प्रयत्नात असते. आता ही WhatsApp आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. यामध्ये नवीन व्हॉईस रेकॉर्डिंग फीचरसह मेसेजिंग आणि प्रोफाईल फोटोंशी संबंधित विशेष फीचरचा समावेश आहे. कंपनी बऱ्याच काळापासून 'या' नवीन वैशिष्ट्यांची बीटा चाचणी करत होती आणि आता ते आयफोन वापरकर्त्यांसाठी आणले जात आहेत.
कंपनी ही वैशिष्ट्ये आवृत्ती क्रमांक 22.2.75 सह देत आहे. परंतु या फीचर्ससाठी अँड्रॉईड यूजर्सला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. तूर्तास, व्हॉट्सऍपच्या या फीचर्समध्ये काय खास आहे याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
नवीन व्हॉइस रेकॉर्डिंग वैशिष्ट्य
यूजर्स या फीचरची खूप आतुरतेनं वाट पाहत होते. नवीन अपडेटनंतर आयफोन यूजर्स या फीचरचा वापर करू शकतील. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना व्हॉइस संदेश रेकॉर्ड करताना पॉझ म्हणजे थांबण्याचे आणि पुन्हा रेकॉर्डिंग सुरू करण्याची अनुमती देते.
या फीचरचा एक फायदा असा आहे की, वापरकर्ते व्हॉईस नोट रेकॉर्डिंग करताना थांबून ते रेकॉर्डिंग करु शकतात. तसेच ते बरोबर नसल्यास डिलीट देखील करता येते आणि रेकॉर्डिंग बरोबर असल्यास तेथून पुढे चालू ठेवता येते.
तुमच्या परवानगीशिवाय कोणीताही युजर्स संदेश पाठवू शकणार नाही
हे वैशिष्ट्य iOS 15 मध्ये उपस्थित फोकस मोड वापरते. या वैशिष्ट्याच्या मदतीने, iOS 15 वापरकर्ते त्यांना कोण संदेश पाठवू शकतात आणि कोण करू शकत नाहीत हे ठरवू शकतात. iOS 15 मध्ये असलेल्या या फीचरद्वारे यूजर्स त्यांचा iPhone DND मोडमध्ये ठेवू शकतात.
सुरुवातीला हे फीचर फक्त iMessage ऍपसाठी उपलब्ध होते, पण आता कंपनीने ते व्हॉट्सऍपवरही उपलब्ध करून दिले आहे.
वापरकर्त्याचा प्रोफाइल फोटो नोटीफिकेशनमध्ये दिसेल
या फीचरचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आता iOS 15 यूजर्सना WhatsApp नोटिफिकेशन्समध्ये मेसेज पाठवणाऱ्याचा फोटोही दिसेल. अपडेट करण्यापूर्वी, वापरकर्त्यांना नोटीफिकेशनमध्ये फक्त वापरकर्त्याचे नाव दिसत होते. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, आयफोन वापरकर्त्यांना iOS 15 किंवा नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे.