तुमच्या मित्रांचे व्हॉट्सएप स्टेटस असे सेव्ह करा
व्हॉट्सएपचा स्टेटस फिचर लोकांना खूप आवडतंय.
मुंबई : एखाद्या मित्राचा मजेशीर व्हॉट्सएप स्टेटस सर्वांना आवडतो. मग आपण ही हाच स्टेट्स ठेवावा यासाठी 'मला फॉरवर्ड कर' अशी आपण त्याला विनंती करतो. पण आता तसं करण्याची गरज नाहीय. कारण व्हॉट्सएपसध्या स्वत:मध्ये वेगाने बदल करतंय. व्हॉट्सएपचा स्टेटस फिचर लोकांना खूप आवडतंय.
अनेकदा युजर्स एखादा कोट्स, मेसेज आणि महत्वाच्या गोष्टी स्टेटसवर ठेवतात. अनेकांना त्या डाऊनलोड करायच्या असतात पण तो प्रयत्न यशस्वी होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी टेक्निक सांगू ज्या माध्यमातून तुम्ही कोणताही स्टेटसचा व्हिडीओ किंवा फोटो डाऊनलोड करु शकता.
तुमच्या मित्रांचा स्टेटस डाऊनलोड करुन असा सेव्ह करा.
यासाठी तुम्हाला व्हॉट्सएप ओपन कराव लागेल.
जिथे तुमच्या मित्राचा स्टेटस आहे, तो उघडा.
तुमच्या फोनच्या फाईल मॅनेजरमध्ये जाव लागेल.
तिथे असलेल्या इंटर्नल स्टोरेजवर टॅप करा.
इथे तुम्हाला व्हॉट्सएपवर सिलेक्ट कराव लागेल.
त्यानंतर मीडिया (Media) ऑप्शनवर क्लीक करा.
यात तुम्ही थोड स्क्रोल केलं की तुम्हा स्टेटसच ऑप्शन मिळेल.
त्यानंतर तुमच्या सर्व मित्रांचे स्टेटस तुम्हाला समोर दिसतील.
तुमच्यामित्राने स्टेट्सला ठेवलेला फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास तो तुम्ही तुमच्या स्टोरीला ठेवू शकता. किंवा गॅलरीत सेव्ह करु शकता.
नव्या रिपोर्टनुसार व्हॉट्सएपमध्ये एंड्रॉइड बीटा टेस्टरसाठी एडव्हान्स सर्च मोड सेवा सुरु झालीय. यामुळे ए व्हॉट्सएप मल्टी डिव्हाइस सेवा सुरु होण्यावर काम सुरु आहे.
PIP मोड म्हणजे काय ?
इंस्टंट मॅसेजिंग एप व्हाट्सएप युजर्सना गेले काही दिवस एक अडचण सतावतेय. यामध्ये पिक्चर इन पिक्चर (PIP) या ऑप्शनचा वापर करता येत नाहीय. WABetaInfo ने यासंदर्भात ट्वीट करत माहिती समोर आणलीय. व्हॉट्सएपमध्ये युट्यूब प्रीव्ह्यू दिसण्यास अडचण येतेय. चॅटमध्ये युट्यूब व्हिडीओ PIP मोडच्या माध्यमातून पाहता येत नाहीय.
WABetaInfo ने केलेल्या ट्वीटनुसार व्हाट्सएपच्या एंड्रॉईड, आयओएस आणि वेब डेस्कटॉपवर ही अडचण येतेयं. युट्यूबकडून यामध्ये बदल केला जातोय. हे फिचर दिसण्यासाठी व्हॉट्सएप अपडेट करण्याची गरज आहे.
PIP मोडच्या माध्यमातून चॅटमध्ये कोणतीही लिंक पाहीली जाऊ शकते. पण आता जर आलेल्या युट्यूब लिंकवर क्लिक केलं तर चॅट व्हिडीओ प्ले होत नाहीय.
जर तुमच्याकडे व्हॉट्सएप चॅटमध्ये कोणता व्हिडीओ आला तर त्यातून बाहेर न पडता तुम्ही तो पाहू शकता. यासाठी तुम्हाला चॅटमधून बाहेर जाण्याची गरज नसते.
व्हॉट्सएपने नुकतंच क्यूआर कोड हे नवं फिचर लॉंच केलंय. यामुळे व्हॉट्सएप नंबर सेव्ह करण्याची पद्धत बदलली आहे. क्यूआर कोड स्कॅन करुन त्यांच्या लिस्टमध्ये नंबर सेव्ह करणं सोपं झालंय. एंड्रॉइड आणि आयओएस युझर्स देखील सेटींग्जमध्ये जाऊन आपल्या नावासमोर स्वत:च्या कस्टम क्यूआर पाहू शकतात.