मुंबई : तुमच्याकडे जुना आयफोन असल्यास ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. व्हॉट्सऍपने एक नवीन सपोर्ट डॉक्युमेंट बाजारात आणला आहे. ज्यामध्ये कंपनीने आयओएस 9 (iOS 9)  किंवा आधीच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट काढून घेतला आहे. आत्तापर्यंत आयओएस 9 यूजर्स एन्क्रिप्टेड चॅट सर्व्हिस वापरत होते.


आता iOS 10 ची गरज भासणार (Now iOS 10 will be needed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता स्मार्टफोनमध्ये आयओएस 10 आवश्यक असेल, म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी यूजर्सना आता आयफोन 5 किंवा त्या नंतरच्या मॅाडल्सची आवश्यकता असेल. आयफोन 4 एसच्या यूजर्सना  याचा परिणाम होईल.परंतु या मॅाडलचा आयफोन वापरणार्‍या यूजर्सची संख्या कमी आहे.


डिसेंबरमध्ये आयफोनने माहिती दिली की, 81 टक्के आयफोन यूजर्स आयओएस 14 आणि 17 टक्के किंवा आयफोन यूजर्स आयओएस 13 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहेत. याचा अर्थ असा आहे की, केवळ दोन टक्के आयफोन यूजर्स आयओएस 12 किंवा जून्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टमचा वापरत करत आहेत.


मागील वर्षी, व्हॅाट्सएप सपोर्ट पेज  यूजर्सना सर्व फीचर्सचे अनुभव घेण्यासाठी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमचा लेटेस्ट वर्जन वापरण्याची सूचना देण्यात आली होती.


गेल्या वर्षी आयफोनला कमीत कमी आयओएस 9 वर अपडेट केरण्याची सूचना देण्यात आली होती आणि एंड्रॉईड यूजर्सना Android 4.0.3 किंवा दुसऱ्या वर्जन डिव्हाइसला अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला होता.


यामध्ये व्हॅाट्सएपच्या नवीन अपडेटनुसार मॅसेंजर रूम (Messenger Rooms) अंतर्गत एक साथ 50 लोकांना व्हिडीओ कॅाल करणे ही शक्य होणार आहे.