व्हॉट्सअॅप कॉलही रेकॉर्ड होईल
व्हॉट्सअॅप सध्या दोन नव्या फिचर्ससाठी काम करीत आहे.
मुंबई : कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे तर दुसऱ्या फिचरमध्ये व्हाट्सअॅप व्हाईस कॉल रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे. हे दोन्ही फिचर्स अॅंड्रॉईडवरच लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅप सध्या दोन नव्या फिचर्ससाठी काम करीत आहे. यातील वैशिष्ट्ये आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
चाचणी सुरू
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ-व्हॉईस कॉल संदर्भात व्हॉट्सअॅप टीमची सध्या चाचपणी सुरू आहे. सुरु असलेला कॉल बंद न करता त्याला व्हिडिओ कॉलमध्ये रुपांतरीत करता येणार आहे. जुलै महिन्यात यासंबधी प्रथम चाचणी करण्यात आली होती. या फिचरची चाचणी झाली असून याचा वापर कसा करायचा यासंबधी स्क्रीनशॉटही पाठविण्यात येणार आहेत.
तरच व्हिडिओ कॉल
कॉल उचलल्यास व्हॉइस कॉल हा अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करणार नाही. समोरच्या व्यक्तीला यासंबंधी गेलेली रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतरच व्हिडिओ कॉल सुरू होऊ शकेल.
रेकॉर्ड व्हॉईस कॉल
व्हॉईस मेसेजसाठी व्हॉट्सअॅप एक नवे फिचर आणत आहे. फोन कॉल सुरु असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन युजरसमोर येईल. कॉल वर बोलायचे किंवा कॉल रेकॉर्ड करायचा याची निवड यातून युजरला करता येणार आहे. त्यामूळे रेकॉर्ड झालेला वॉईस कॉल नंतरही ऐकता येणार आहे.
डिलीट फॉर एव्हरीवन
या महिन्याच्या सुरुवातीला व्हाट्सअॅपने आपल्या 'युजर्ससाठी डिलीट फॉर एव्हरीवन' हे फिचर आणले आहे. ७ मिनिटांच्या अवधीत एखादा मेसेज डिलीट करता येत आहे.