WhatsApp वर तुमचा जोडीदार केव्हा आणि किती वेळा Online येतो? हे असे माहित करुन घ्या
तुम्हाला अशा एका युक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.
मुंबई : Whatsappचा वापर भारतच काय, तर प्रत्येक देशात केला जातो. चॅटींग करण्यासाठी आपण दुसऱ्या कोणत्याही अॅपकडे न वळता जास्तीत जास्त लोकं Whatsapp चा वापर करतात. कारण Whatsapp हा गप्पा मारण्याचा सर्वात सोपा मार्ग त्याच्या यूझर्सला देत असतो. चॅटींगच काय आपण याद्वारे ऑडीओ आणि व्हिडीओ कॉल देखील करू शकतो. त्याचबरोबर Whatsapp आपल्या यूझर्सला चांगला Experience देण्यासाठी त्यामध्ये नेहमीच काही ना काही बदल करत असतो.
परंतु सगळ्यांनाच या फीचरबद्दल माहित नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा एका युक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची माहिती फारच कमी लोकांना असेल.
या मजेदार युक्तीद्वारे, तुम्ही व्हॉट्सअॅप न उघडता हे शोधू शकता की, तुमचा जोडीदार, मित्र किंवा कुटुंबातील व्यक्ती कधी आणि कितीवेळा ऑनलाइन आला आहे. हे कसं शक्य आहे ते जाणून घेऊया
जेव्हा तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज करता, तेव्हा लगेचच रिप्लाय मिळण्यासाठी समोरची व्यक्तीही ऑनलाईन असणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला आपल्या जवळची व्यक्ती कधी ऑनलाइन येते हे समजायला हवे.
या trick साठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करावे लागेल. सर्वप्रथम आपल्याला Google play store वर जाऊन GBWhatapp शोधावे लागेल. तो उघडल्यानंतर तुम्हाला त्याची APK फाइल डाऊनलोड करावी लागेल.
तुम्ही APK फाइल Install केल्यानंतर, प्रथम सेटिंग्जवर जा आणि तेथे तुम्हाला मुख्य चॅट स्क्रीन दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्क्रीनवर तुम्हाला ऑनलाईन टेस्टचा पर्याय मिळेल. त्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या ऑनलाइन स्टेटसवर सिलेक्ट करावे लागेल ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे.
त्यानंतर जेव्हा ही ती व्यक्ती ऑनलाइन येईल तेव्हा तुम्हाला त्वरित सूचना मिळेल. त्यानंतर आपण त्या व्यक्तीच बोलू शकता आणि लगेचच रिप्लाय मिळवू शकता.