मुंबई : भारतातील लाखो लोकं कोणाशीही बोलण्यासाठी किंवा कोणताही मॅसेज करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. या अ‍ॅपद्वारे लोकं गप्पांसह ऑडीओ आणि व्हिडीओ कॉल देखील करतात. व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे लोकं या अ‍ॅपशी संबंधित टिप्स आणि युक्त्या शोधत असतात. या अ‍ॅपमध्ये अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्याबद्दल लोकांना अजूनही माहिती नसते. तर आज आम्ही तुम्हाला असा गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही नेहमी विचार करत असता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपने मॅसेज केल्यानंतर तो डीलीट करण्याचा देखील पर्याय दिला आहे. परंतु, समोरच्या व्यक्तीने केलेल मॅसेज जर समजा डीलीट केला तर आपल्याला नेहमी असे वाटत असते की, याने काय बरे मॅसेज केला असावा आणि दिवसभर आपल्या विचारात ती एकच गोष्ट रहाते.


त्यामुळे आज आम्ही तुमचा त्रास कमी करण्यासाठी एक युक्ती सांगणार आहोत. या छोट्या युक्तीने तुम्ही हटवलेले मॅसेज, ऑडीओ आणि व्हिडीओ कसे पाहू शकता, हे सांगणार आहोत.


व्हॉट्सअ‍ॅप डिलीट अ‍ॅप डाउनलोड करा


ही युक्ती वापरण्यासाठी, तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप वापरावे लागेल. सर्व प्रथम व्हाट्सअ‍ॅप डिलीट अ‍ॅप डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला होय वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आपल्याला परवानगी द्यावी लागेल. तरच हे अ‍ॅप योग्यरित्या कार्य करेल.


हटवलेले मॅसेज, ऑडीओ किंवा व्हिडीओ असे दिसतील


-यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरही काही सेटिंग्ज कराव्या लागतील. व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.


-सेटिंग्ज वर जा आणि डेटा आणि स्टोरेज वापर वर जा.


-तुमच्या मीडिया ऑटो डाउनलोड वर जाऊन सर्व गोष्टी परवानगी द्या. हे तुमच्या सर्व फायली स्वयंचलितपणे डाउनलोड करेल.


-त्यानंतर तुम्ही हटवलेले किंवा डीलीट केलेले मॅसेज, ऑडीओ किंवा व्हिडीओ पुनर्प्राप्त करण्यात सक्षम व्हाल.


-त्यानंतर कोणीही तुम्हाला मॅसेज, ऑडीओ किंवा व्हिडिओ क्लिप पाठवून हटवले किंवा डीलीट केले. तर त्यानंतर तुम्ही डाउनलोड केलेल्या गोष्टी अ‍ॅप उघडून पाहू शकता.