नवी दिल्ली : फेक न्यूजवर लगाम घालण्यासाठी भारत सरकारने धाडलेल्या नोटीससनंतर व्हॉट्सअॅपतर्फे कडक पाऊले उचलण्यात आली आहेत. यामुळे भारतीयांच्या वापरातून एक फिचर कायमचे काढून टाकण्यात येतंय. भारतीयांसाठी मेसेज पाठविण्याची लिमिटदेखील ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय युझर्सना क्विक फॉरवर्ड बटणाचा उपयोग करता येणार नाही. मीडिया मेसेजच्या ऑप्शननंतर क्वीक फॉरवर्डचे ऑप्शन येतं. व्हॉट्सअॅपने केवळ भारतीयांसाठीच हे बदल केले आहेत.


जास्त फॉरवर्ड करतात भारतीय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर देशांच्या तुलनेत भारतीय सर्वाधिक मेसेज फॉरवर्ड करत असल्याचे व्हॉट्सअॅपच्या नव्या गाईडलाईनमध्ये म्हटलंय. यामध्ये व्हिडिओ आणि फोटोसचे प्रमाण जास्त असतेय साधारण २० कोटी भारतीय व्हॉट्सअॅपवर आहेत. पण फेक न्यूज वर लगाम लावण्यासाठी भारत सरकारने व्हॉट्सअॅपला नोटीस जारी केले होते. व्हॉट्सअॅपवर फेक मेसेज पसरल्याने देशात अनेक ठिकाणी मॉब लिंचिंगचे प्रकार समोर आले होते. 



क्विव फॉरवर्डींग बंद 


नवे बदल करणार असल्याचे व्हॉट्सअॅपने जारी केले होते. त्यानुसार क्विक फॉरवर्ड बटण हटविण्यात आलंय.  त्यांच्यातर्फे आता फॉरवर्डिंगची लिमिट टेस्टिंग करण्यात येत आहे. त्यानुसार एकावेळी ५ जणांनाच मेसेज फॉरवर्ड करता येणार आहे.