Whatsapp हे असेच एक अॅप आहे जे तुम्हाला आज जवळपास प्रत्येक स्मार्टफोनमध्ये (smartphone) सापडेल. या इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर आता फक्त चॅटिंग आणि कॉल करण्यासाठी नाही. यावर ग्रुप तयार केले जातो. परंतु काही वेळेस या अॅपचा वापर करताना मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर (video share) करताना कायद्याचे उल्लंघन करतो. म्हणून WhatsApp चा वापर हा सुरक्षित केला पाहिजे.  या अॅप वर अशा काही गोष्टी आहेत, ज्यावर क्लिक केले किंवा फॉरवर्ड केले का तुम्हाला त्याची मोठी शिक्षा भोगावी लागू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. बाल पोर्नोग्राफी


जर तुम्ही चुकून चाइल्ड पोर्नोग्राफीशी (child) संबंधित फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर शेअर केलात तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. या कायद्याच्या उल्लंघनामुळे गेल्या काही वर्षांत दिल्ली पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे चुकूनही चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गोष्टी व्हॉट्सअॅपवर शेअर करू नका.


2. सामाजिक भेदभावाला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ


समाजात भेदभाव पसरवणारा असा कोणताही व्हिडीओ, फोटो, मेसेज व्हायरल किंवा पाठवल्यास तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत आहात. व्हॉट्सअॅपवर तुमच्याकडे असा व्हिडिओ असेल तर तो फॉरवर्ड करण्याऐवजी लगेच डिलीट करा. समाजात भेदभाव पसरवणारे मेसेज, व्हिडिओ आणि फोटो शेअर केल्याबद्दल तुरुंगात जाऊ शकते.


वाचा : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर


3. खोट्या बातम्या शेअर करण्यावर


फेक न्यूजबाबतही व्हॉट्सअॅपचे धोरण कठोर आहे. याशिवाय फेक न्यूजबाबतही सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. जर खोट्या बातम्यांमुळे हिंसाचार किंवा भेदभावासारख्या गोष्टी समाजात आणि देशात पसरल्या तर तो कायद्याने गुन्हा ठरेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर फेक न्यूज पसरवली, म्हणजेच ती प्रसारित केली, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. त्यामुळेच व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या प्रत्येक बातम्या लगेच शेअर न करणे महत्त्वाचे आहे. आधी ते बरोबर आहे की अयोग्य याची पडताळणी करा.