नवी दिल्ली : नव्या वर्षामध्ये अनेक मोबाईल, टेलीकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत आहेत. या कंपन्यांच्या स्पर्धेत ग्राहकांना कमी पैशांत चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. पण यामध्ये स्मार्टफोन युझर्सची काळजी वाढवणारी बातमीही समोर येत आहे. उद्यापासून तुमच्यापैकी काहीजणांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप दिसणे बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपने हा निर्णय घेतलाय. व्हॉट्सअॅप आपली सुविधा काही स्मार्टफोनपुरतीच मर्यादीत ठेवणार आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्ले स्टोर असो किंवा अॅपल स्टोर सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हे कोट्यावधी युझर्सनी डाऊनलोड केले आहे. पण व्हॉट्सअॅपने नुकतीच एक यादी जाहीर केली असून त्यातील ऑपरेटींग सिस्टिममध्ये व्हॉट्सअॅप उद्यापासून दिसू शकणार नाही.


व्हॉट्सअॅप बंद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझर्स आजही नोकिया s40 ऑपरेटींग सिस्टिमचा वापर करतात. त्यांच्या फोनसाठी व्हॉट्सअॅन नवे फिचर्स डेव्हलप करणार नाही. तसेच या फोनवरील व्हॉट्सअॅपचे काही फिचर्स तर कधीही काम करण्याचे बंद होतील. अॅण्ड्रॉईड वर्जन 2.3.7 आणि त्याआधीची ऑपरेटींग सिस्टिम iOS7  आणि जुन्या ऑपरेटींग सिस्टिमवर चालणाऱ्या आयफोनवर 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप चालणार नाही. यामध्येही व्हॉट्सअॅपचे काही फिचर्स चालणे केव्हाही बंद होऊ शकते. येणाऱ्या सात वर्षांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत असून युझर्स ज्या फोन्सचा जास्तीत जास्त वापर करतात त्यांच्याकडे लक्ष देणार असल्याचे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे.


इथले व्हॉट्सअॅप बंद 


2.3.3 पेक्षा जुने अॅण्ड्राईड वर्जन 
विंन्डो फोन 7
आयफोन 3G/iOS6
नोकिया सिम्बियन S60


इथले व्हॉट्सअॅप सुरूच


विंन्डोस फोन 8.1+ 
आयफोन रनिंग iOS8+
रनिंग OS 4.0+
जियोफोन 
जियोफोन 


त्यामुळे तुम्ही आजही नोकिया S40 किंवा त्याआधीच्या ऑपरेटींग सिस्टिमवर काम करत असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअॅपही हवे आहे तर तुम्हाला नवा फोन घेण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे ऑपरेटींग सिस्टिम अपडेट करण्याचे ऑप्शन असेल तरच तुम्ही अशावेळी व्हॉट्सअॅपचा वापर करु शकता.