मुंबई : आजकाल पाणी पिण्याची वेळ लक्षात ठेवण्यापासून ते अगदी रेल्वेचं तिकीट बुक करण्यापर्यंत दिवसभरातील अनेक लहान मोठ्या गोष्टींसाठी आपण एखाद्या अ‍ॅपवर अवलंबून असतो. मात्र एक ना अनेक आवश्यक गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर होत असल्याने अनेकदा बॅटरी पटकन डिस्चार्ज होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल ग्राहकांचा हाच त्रास लक्षात घेऊन जिओने स्मार्टफोन धारकांसाठी नवी धमाकेदार ऑफर आणली आहे. 


रिलायन्स जिओची नवी ऑफर 


नवं आर्थिक वर्ष सुरू होताच रिलायन्सने JioJuice ही सुविधा सुरू केली आहे. रिलायन्स जिओने जाहीर केलेल्या नव्या ऑफरनुसार, त्याच्या नव्या सीम कार्डद्वारा आता मोबाईल फोनदेखील चार्ज होणार आहे.  याकरिता तुम्हांला चार्जिंग पॉईंट किंवा चार्जरची गरज नाही. जिओच्या सीम कार्डमुळे पॉवर बॅंकेचीही गरज लागणार नाही. 


ट्विटरवर व्हिडिओ 


 




रिलायन्स जिओने या नव्या सेवेबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र ही ग्राहकांसाठी कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती  दिलेली नाही. हा ट्विटर 1 एप्रिलला ग्राहकांसमोर आल्याने हा 'एप्रिल फूल प्रॅंक' असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शनच्या मदतीने फोन चार्ज होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.