Google CEO Sundar Pichai Phone: गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Google CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्या पगाराबरोबर त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेण्यास भारतीयांना फार उत्सुकता असते. भारतीय वंशाचे पिचाई हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यापासून अनेकदा भारत दौऱ्यावर आले आहेत. अगदी क्रिकेटपासून ते चित्रपटांपर्यंत अनेक गोष्टींसंदर्भात बोलताना पिचाई यांच्यातील भारतीयत्व अधोरेखित झाल्याचं पहायला मिळतं. याचमुळे पिचाईंबद्दलची भारतीयांना फार उत्सुकता असते. अशाच उत्सुकतेपोटी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर नुकतच पिचाई यांनी दिलं. 


कोणता फोन वापरतात पिचाई?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय युट्यूबर अरूण मानी याला नुकतीच पिचाई यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पिचाई यांना तुम्ही कोणता फोन वापरता असा प्रश्न अरूणने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पिचाई यांनी नुकताच लॉन्च झालेला गुगलचा पिक्सल फोल्ड (Google Pixel Fold) आपण वापरत असल्याचं सांगितलं. मात्र आपला आवडता फोन हा गुगल पिक्सल 7 प्रो (Google Pixel Pro) असल्याचही त्यांनी सांगितलं. तसेच गुगलच्या सीईओंनी फोनमधील फिचर्सची पहाणी करण्याच्या उद्देशाने आपण सॅमसंग गॅलेक्सी आणि आयफोनचाही वापर करतो असंही मान्य केलं आहे.


प्रवासामध्ये वापरतात वेगळा फोन


आपण प्रवास करत असताना पिक्सल फोल्डऐवजी पिक्सल 7 प्रो वापरण्यास प्राधान्य देतो असंही पिचाई म्हणाले. यामागील मुख्य कारण म्हणजे पिक्सल 7 प्रो हा वजनाने हलका आहे असं त्यांनी सांगितलं. टेस्टिंगसाठी मागील बऱ्याच काळापासून आपण पिक्सल फोल्डचा वापर करत असल्याचं पिचाई यांनी सांगितलं. आपल्याला या फोनबद्दची माहिती जाणून घेण्यासाठी तो आपण वापरतोय असंही ते म्हणाले. अरूण मानीने पिचाईंच्या मुलाखतीचा व्हिडीओ 4 दिवसांपूर्वी युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला 2.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


या फोनची किंमत किती? फिचर्स कोणते?


गुगलने आयओ 2023 डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला होता. गुगल पिक्सल फोल्ड नावाने हा फोन लॉन्च करण्यात आलेला. या फोनची किंमत 1799 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत 1.47 लाख रुपये इतकी होते. हा फोन फोल्ड असताना 5.8 इंचाचा असतो. अनफोल्ड केल्यावर फोन एका टॅबमध्ये बदलतो ज्याची स्क्रीन 7.6 इंचांची असते. व्हिडीओ गेम खेळण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फाइल एटीड करण्यासाठी यामुळे युझर्सला मोठी स्क्रीन उपलब्ध होते. ही स्क्रीन ओएलईडी पॅनलसहीत येते. या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 एचझेड इतका आहे. 


पिक्सल फोल्डमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये f/1.2 अपर्चर आणि ओआयएससहीत 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच f/2.22 अपर्चरसहीत 10.8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा अन् f/3.05 अपर्चरसहीत 10.8 मेगापिक्सलसहीत 5 एक्स ऑप्टिकल झूम फोटो लेन्स देण्यात आली आहे. हा फोन टेन्सर 2 वर काम करतो. फोनमध्ये 12 जीबी रॅम देण्यात आली आहे.