नवी दिल्ली : अॅनरॉईड फोन वापरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. जगताली सर्वात मोठ्या टेस्ट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन अपडेट घेवून येत आहे. या अपडेटनंतर व्हॉट्सअॅपवर व्हाईस रेकॉर्ड करणे सोपे होईल.


काय मिळणार सुविधा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अपडेट लॉक्ड रिकॉर्डिंग (Locked Recording) हे फिचर घेऊन येत आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स व्हॉईस रेकॉर्ड करु शकतात. यासाठी युजरला व्हॉईस मेसेज पाठवताना रेकॉर्डचे बटन होल्ड करुन ठेवावे लागते. मात्र आता नव्या अपडेटमध्ये पूर्ण रेकॉर्डींग होईपर्यंत बटन होल्ड करण्याची गरज लागणार नाही. फक्त एकदाच बटण प्रेस करुन रेकॉर्डींग सुरु करा आणि संपल्यावर रेकॉर्ड आयकॉनवर क्लिक करा.


हा ही होणार फायदा


रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचे हे फिचर सध्या अॅनरॉईडच्या बीट व्हर्जनवर २.१८.७० आणि २.१८.७१ वर सध्या याचे टेस्टिंग सुरु आहे. तसंच या नव्या अपडेटमुळे व्हॉईस रेकॉर्डचा प्रिव्यू ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे झालेल्या चुका लगेच निर्दशनास येतील.