Twitter vs Elon Musk : सध्या ट्विटर (Twitter) विरुद्ध एलॉन मस्क (Elon Musk) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे. त्यानंतर ट्विटरनं हा वाद आता कोर्टात गेला आहे. त्यानंतर आता इलॉन मस्क यांच्याविरोधात ट्विटकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ट्विटरने बनावट खात्यांची माहिती न दिल्याने हा करार रद्द करत असल्याची घोषणा एलन मस्क यांनी केली. तब्बल 44 अब्ज डॉलरचा करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे  Twitter मोठा धक्का बसला आहे.   


इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी ४४ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली, जी ट्विटरने स्वीकारली. पण इलॉन मस्क यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. “ट्विटर डील तात्पुरते थांबवले आहे. स्पॅम किंवा बनावट खाती ५ टक्क्यांपेक्षा कमी वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतात. याबाबत माहिती मिळणे बाकी आहे,”असे एका ट्विटमध्ये, मस्क म्हणाले. 


स्पॅम आणि बनावट खात्यांच्या संख्येमुळे करार थांबला


टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर करार स्थगित करण्याबाबत माहिती देण्यासाठी ट्विट केले. यामागचे कारण म्हणून त्यांनी स्पॅम आणि बनावट खात्यांची संख्या सांगितली. काही दिवसांपूर्वी, ट्विटरने सांगितले की पहिल्या तिमाहीत, दैनिक सक्रिय वापरकर्त्यांमधील बनावट किंवा स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी होती. ट्विटरशी झालेल्या करारानंतर इलॉन मस्क यांनी या प्लॅटफॉर्मवरून ‘स्पॅम बॉट्स’ पूर्णपणे काढून टाकण्याविषयी सांगितले होते.


 त्यावर ट्विटकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.  ट्विटरच्या अंदाजानुसार पहिल्या तिमाहीत बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या त्याच्या कमाई केलेल्या दैनिक सक्रिय वापरकर्त्यांपैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी होती. डील अंतर्गत इलॉन मस्क यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण करार केल्यानंतर, त्यांनी सांगितले की ट्विटरवरून ‘स्पॅम बॉट’ काढून टाकणे हे त्यांच्या प्राधान्यांपैकी एक आहे.   


ट्विटर खरेदीचा 44 अब्ज डॉलरचा करार रद्द


एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलं. कंपनीने अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला आहे. एलॉन मस्क यांनी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केले आहेत. मस्क यांनी म्हटलं आहे की, 'ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts) तपशील देण्यात अयशस्वी ठरली.