Auto New : केंद्र शासनाच्या GST परिषदेचत नुकतेच सेस आणि जीएसटी संदर्भातील निर्णय घेण्यात आले. ज्यानंतर एसुव्ही कारचे दर वाढणार असल्याची बाब समोर आली. इथं सेडान आणि एसयुव्ही कारबाबतच्या चर्चा सुरु असताना तिथं एका अफलातून Car Model नं नजरा वळवल्या. नेता म्हणू नका अभिनेता म्हणू नका किंवा एखादा व्यावसायिक. अनेकांच्याच आवडीची ही कार म्हणजे पजेरो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ली रस्त्यांवर आणि अनेकांच्या Search History मध्ये मारुती, टोयोटा, फोर्ड, महिंद्रा अशा कार दिसतात. काही वर्षांपूर्वी हे चित्र वेगळं होतं. कारण, अनेकजण पजेरोविषयीचीच माहिती शोधताना दिसायचे. मित्सुबिशी पजेरो (Mitsubishi Pajero) चं वेगळेपण काही औरच. 


जपानची निर्मिती... 


जपानी कार उत्पादक मित्सुबिशीनं साधारण 2002 मध्ये पजेरो कार भारतात आणली. इथं हिंदुस्तान मोटर्स (Hindustan Motors) च्या सोबतीनं ही कार लाँच करण्यात आली होती. कमालीची ऑफरोडिंग क्षमता आणि दमदार इंजिन या गुणांमुळं पजेरोचीच निवड करणारे अनेक होते. 


अशी कार शोधूनही सापडणार नाही... 


पजेरो जेव्हा मित्सुबिशी आणि हिंदुस्तान मोटर्सनं  मिळून भारतात लाँच केली तेव्हा तिची एक्स शोरुम किंमत 19.7 लाख रुपये इतकी होती. पहिल्याच वर्षापासून कारला मिळणारी लोकप्रियता पाहता 2006 मध्ये या कारचं अपडेटेड मॉडेल लाँच करण्यात आलं. ऑफ रोडिंगमध्ये असणारी महारथ हे तर कारचं फिचर होतंच. पण, तिचं इंजिनही प्रचंड ताकदीचं होतं. पजेरो ही एक एसयुव्ही असून, तिला 2.8 लीटर 4 सिलिंडर SOHC डीजल इंजिनचं नवं अपडेटेड व्हर्जन जोण्यात आलं होतं.  4-व्हील ड्राइव सिस्टीम असूनही ही कार खडकाळ रस्त्यांवर, चढ असणाऱ्या भागावरही तितकीच कमालीची चालत होती. पजेरो स्पोर्टलाही भारतात लक्षवेधी प्रतिसाद मिळाला. 2021 मध्ये ही कार लाँच झाली असून, त्यात असणारं आधुनिक तंत्रज्ञान थक्क करणारं होतं. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही गिअरबॉक्ससह ही कार बाजारात आली होती. 


हेसुद्धा वाचा : Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर 


उत्पादन का थाबवलं? 


एकाएकी मित्सुबिशीनं जपानच्याच बाजारपेठेतून या कारचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. पण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कारची मागणी पाहता तिचं उत्पादन सुरुच होतं. पण, कोरोनाचं संकट आलं आणि पुन्हा एकदा कंपनीला प्रचंड नुकसान सोसावं लागलं. अखेर याच टप्प्यावर अनेक देशाचील व्यवसाय आटोपता घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतात अखेरची पजेरो 2021 मध्ये विकली गेली तेव्हापासून आजपर्यंत मित्सुबिशीनं भारतात कोणतीही कार विकलेली नाही.