मुंबई : तुम्ही मुंबई-दिल्लीसारख्या शहरांत राहत असाल तर अनेकदा भल्या मोठ्या इमारतीच्या लिफ्टमध्ये चढण्या-उतरण्याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल, यात शंकाच नाही... आता तर जवळपास प्रत्येक इमारतीला लिफ्ट असते आणि लिफ्टमध्ये आरसा... ज्यात तुम्ही स्वत:ला कधी ओझरतं तर कधी सर्वांदेखत निरखून पाहीलं असेल... पण, तुम्हाला माहीत आहे का? की मोठाल्या इमारतींच्या लिफ्टमध्ये आरसा का असतो? तर तुमच्या माहितीसाठी, लिफ्ट बनवणाऱ्या कंपन्या आणि इंजिनिअर्सनं खूप विचार करून लिफ्टमध्ये आरसा लावण्याचा निर्णय घेतलेला आहे.


लिफ्टचा वापर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरात औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाली, जवळपास त्याच दरम्यान उंच इमारती बनवायला प्रारंभ झाला. मोठ्या शहरांत जमिनी कमी पडत गेल्या आणि इमारतींची उंची वाढत गेली... मग, त्यापाठोपाठ या इमारतींमध्ये लिफ्टची सुविधा आली... लोक या लिफ्टचा वापर करू लागले... आणि मग त्यांना लिफ्टमध्ये आपला खूप वेळ खर्च होत असल्याचं वाटू लागलं... सर्वात वरच्या मजल्यावर जाईपर्यंत लोकांना कंटाळाही यायला लागला... 


वापरकर्त्यांच्या तक्रारी


त्यामुळे या लिफ्ट खूपच धीम्या गतीनं काम करत असल्याची तक्रार लोक करू लागले. इतकंच नाही तर अनेकांनी तक्रार केली की, लिफ्टचा वापर करत असताना आम्हाला धास्ती वाटते की वरच्या मजल्यावर जाईपर्यंत मध्येच एखादा अपघात तर होणार नाही ना? ही धास्ती लोकांच्या तक्रारीचं मुख्य कारण होती. 


तज्ज्ञांची युक्ती 


यावर, मग तज्ज्ञांनी एक युक्ती शोधून काढली... लोकांच्या मनातली भीती घालवायची असेल तर लिफ्टचा वेग आणखी वाढवण्यापेक्षा त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. लिफ्टमध्ये आरसा लावला गेला तर लोक स्वत:ला न्याहाळण्यात मग्न होतील, त्यामुळे आपोआपच त्यांचा वेळही जाईल आणि लिफ्टच्या स्पीडकडे त्यांचं लक्ष न गेल्यानं आपसूकच त्यांच्या मनातील भीतीही कमी होईल.


आणि खरोखरच ही युक्ती कामीही आली... आणि लिफ्टच्या वेगात बदलही करावे लागले नाहीत.