सगळ्याच सिमकार्डचा एक कोना तुटलेला का असतो? जाणून घ्या
तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, या सिमकार्डचा एका बाजूचा कोना अर्धा तुटलेला का असतो? तो सिमकार्ड पूर्ण आयताकृती का नसतो ते?
मुंबई : सिमकार्ड म्हणजे कोणत्याही मोबाईलचं हृदय. जसे हृदयाशिवाय माणूस नाही, तसे सिमकार्ड शिवाय मोबाईल नाही. सिमकार्डच संपूण मोबाईला नेटवर्क देतो, ज्यामुळे आपण जगात कोणालाही कुठूनही फोन लावू शकतो, लोकांशी बोलू शकतो. मोबाईलमुळे जग अगदीजवळ आले आहे. ज्यामुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर संवाद करु शकतो. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का की, या सिमकार्डचा एका बाजूचा कोना अर्धा तुटलेला का असतो? तो सिमकार्ड पूर्ण आयताकृती का नसतो ते? आज आम्ही तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
खरेतर सिमकार्ड्सचे हे डिझाइनचे कारण आहे मोबाईल. सुरवातीला तयार करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सिमकार्ड बदलण्याचा पर्याय नव्हता तसेच तो सिमकार्ड मोबाईमध्ये घट्ट बसायचा, ज्यामुळे तो मोबाईलमधून बाहेर सहसा पडायचा नाही किंवा जागेवरुन हलायचा नाही.
सुरवातील मोबाईल जेव्हा आला तेव्हा त्याच्यात सिमकार्ड बदलण्याची सुविधा नव्हती, तसेच ज्या कंपनीचा मोबाईल असायचा त्याच कंपनीचा कार्ड घ्यावा लागायचा जो फिक्स बसवला जायचा.
बदलत्या काळातील बदलते तंत्रज्ञान
बदलत्या काळातील तंत्रज्ञानासहित मोबाईलचे तंत्रज्ञान बदलले आणि नवीन नवीन फोन बाजारात येऊ लागले, या नवीन मोबाईल फोनमधून सिमकार्ड बाहेर काढण्याचा आणि टाकण्याचा पर्याय उपलब्ध होता.
परंतु तरीही या सिमकार्डचा एक कोना तुटलेला किंवा अर्धवट नव्हता. परंतु नंतर लोकं जेव्हा मोबाइल फोनमध्ये सिम काढू किंवा टाकू लागले, तेव्हा त्यांना बऱ्याचदा मोबाईलमध्ये त्याला निट लावता यायचा नाही. ज्यामुळे नेटवर्क किंवा अन्य समस्यांना नागरिकांना सामोरो जावे लागत होते.
त्यानंतर वारंवार लोकांकडून येत असलेल्या तक्ररींमुळे मग टेलिकॉम कंपनीने सिमच्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा विचार केला. ज्यामुळे लोकांना या सिमकार्डमुळे भविष्यात कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.]
कारण सिमकार्ड वापरताना लोकांना पहिला प्रश्न हाच पडायचा की, नक्की कोणत्या बाजूने तो लावावा. काही लोकं त्याला चूकीच्या बाजूने लावत असल्याने त्यांना समस्यांना तोंड द्यावे लगत होते.