सावधान! तुमच्या या चुकीमुळे होतो फोनचा स्फोट
स्मार्टफोन स्फोट होण्यामागची कारणं
मुंबई : तुम्ही असं ऐकलं असेल की एका नंबरवरुन फोन आला आणि त्यानंतर फोनचा स्फोट झाला. चार्जिंगला फोन लावल्यानंतर फोनचा स्फोट झाला. फोनवर बोलत असतांना स्फोट झाला. पण कोणत्या गोष्टीमुळे फोनचा स्फोट होतो याचं कारण तुम्हाला माहिती हवं. फोन स्फोट होण्याचं मुख्य कारण असतं हे फोन हिट होणं.
चार्जिंगला लावल्यानंतर...
फोन चार्जिंगला लावला असता तो वेळ फोनला आराम देण्याची वेळ असते. यावेळी फक्त फोनला चार्ज होऊ दिला पाहिजे. अशा वेळी फोनवर अजून काही कामं करु नका. फोन चार्जिंगला लावून बोलणं तुमच्यासाठी फार धोकादायक ठरु शकतं. जर तुम्हाला काही मह्त्त्वाचं काम नसेल तर फोन स्विच ऑफ करुन तो चार्ज करा.
पूर्ण रात्र फोन चार्ज करणे
काही लोकांना सवय असते की ते पूर्ण रात्र फोनला चार्जिेंगला लावून ठेवता. त्यानंतर सकाळी उठून फोन घेऊन जातात. असं करणं खूप धोक्याचं असू शकतं. ओव्हर चार्जिंगमुळे फोनचा स्फोट होण्याची शक्यता देखील अधिक असते. अशा गोष्टींपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे.
ओरिजनल चार्जर वापरा
अनेकदा चार्जर खराब झाल्यामुळे पैसे वाचवण्यासाठी लोकं ड्युबलिकेट चार्जर खरेदी करतात. ज्या कंपनीचा फोन आहे त्याचं कंपनीचा चार्जर असणं महत्त्वाचं आहे. ऑफिशिअल वेबसाईटवर जावून ओरिजनल चार्जर खरेदी करा.