Winter Bike Tips: हिवाळ्यात तुमची बाईकला चांगलं मायलेज मिळवण्यासाठी आणि तिला चांगल्या कंडीशनमध्ये ठेवण्यासाठी तिचं मेन्टेनन्स करण्याची गरज असते. जर तुमच्या बाईकमध्ये काही खास मेन्टेनेंस करावे लागतील जेणे करून हिवाळ्यात ती चांगलं मायलेज देईल. आता या कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया. ज्या हिवाळ्याच्या सुरुवातीला बाईकमध्ये करणं गरजेचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. एअर फिल्टरची सफाई


एअर फिल्टरची सफाईत धूळ आणि कचरा अडकते. ज्यामुळे इंजनमध्ये गरजे इतकी हवा मिळत नाही आणि मायलेजवर त्याचा परिणाम होतो. एअर फिल्टरची सफाई किंवा त्याला बदलनं योग्य ठरू शकतं. त्यामुळे इंजन खूप चांगल्या पद्धतीनं काम करु शकेल.


2. टायर प्रेशर तपासा


हिवाळ्यात टायरचं प्रेशर कमी होऊ शकतं. ज्यामुळे बाईकचा बॅलेन्स आणि मायलेज दोन्ही चांगल्या पद्धतीनं कार्यरत होतात. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला टायर प्रेशरचा तपास करण्यासाठई आणि योग्य अर्थात गरज तेवढी हवा भरा. 


३. चेन आणि ब्रेकची सर्विसिंग


हिवाळ्यात चेन आणि ब्रेकला जंग लागण्याची शक्यता वाढते. चेनला स्वच्छ ठेवत त्यावर लुब्रिकेंट लावून घ्या आणि ब्रेकची तपासणी करा आणि योग्य पद्धतीनं काम करते की नाही हे देखील एकदा तपासा. 


४. इंजन ऑइल बदला


हिवाळ्यात इंजन ऑइन हे घट्ट होण्याची शक्यता असते. ज्यामुळे इंजनवर जास्त प्रेशर पडतं आणि मायलेज कमी होऊ शकतं. त्यामुळए जुनं ऑइल बदलून चांगल्या ग्रेडचं नवं इंजन ऑइल टाका. जे हिवाळ्यात योग्य पद्धतीनं फ्लो होऊ शकतं.


५. स्पार्क प्लग तपासा


स्पार्क प्लग तपासून पाहा, जेणे करून इंजनचं इग्निशन प्रोसेस मंद गतीवर सुरु होते. त्यामुळे फ्यूल जळतं आणि जास्त फ्यूल लागेल. हिवाळा सुरु होण्याआधी स्पार्क प्लग तपासून पाहा आणि जर गरज भासल्यास त्याला बदलून घ्या. 


हेही वाचा : मार्केटमध्येआली सगळ्यात स्वस्त कार; शोरूम बाहेर खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त...


लक्षात ठेवा हिवाळ्यात कोणत्याही गाडीची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण हिवाळ्यात अनेकदा थंडीमुळे गाड्या जॅम होतात. अनेकदा गाडी चालू होण्यास मदत होते.