मुंबई : गुगलच्या माध्यामातून तर अनेक जण घरबसल्या हजारो रूपये कमवतात. पण आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही पैसे कमवता येणार आहेत. आजचा तरूणवर्ग सोशल मीडियाचा सर्रास वापर करतो. आता त्यांच्यासाठी पैसे कमवण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कमवण्याची इच्छा असेल तर तुमची फॉलोअर्स लिस्ट तगडी असणं गरजेच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉलोअर्स वाढवण्यासाठी इन्स्टाग्रामवर तुमचा प्रोफाईल फोटो आकर्षीत हवा. तेव्हाच युजर्स तुम्हाला फॉलो करतील. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवरील माहिती देखील दमदार असायला हवी. याच गोष्टीला लक्षात घेवून तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो आणि माहिती अपडेट करा. डीपी आणि माहिती आकर्षीत असल्याच नेटकरी तुम्हाला फॉलो करतील.



तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय आहात का? 


सुंदर फोटो आणि माहिती सोबतच महत्वाचं आहे की इन्स्टाग्रामवर तुम्ही किती सक्रीय आहात. कित्येक वेळी तुम्ही विसरता की तुमचा आकाउंट इन्स्टाग्रावर आहे. तर काही फोटो पोस्ट करतात त्यानंतर अधिक कालावधी अकाउंटकडे पाहत देखील नाही. त्यामुळे फॉलोअर्स वाढवण्यासाठी इन्स्टाग्रामवर सक्रीय असणं गरजेचं आहे.   


कसे कमवाल पैसे.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून उत्पन्नाची संकल्पना ब्लॉगिंगशी मिळती जुळती आहे. येथे युजर आपल्या अकाउंटद्वारे पार्टनर किंवा ग्राहकाच्या सेवेला प्रोत्साहीत करू शकतो. त्यामुळे जाहिरातीच्या बदल्यात तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या फॉलोअर्सचे प्रमाण वाढेल्यास तुमचे उत्पन्न देखील वाढेल.  


विकू शकता इन्स्टाग्राम अकाउंट
जर तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अकाउंट सांभाळणे शक्य नसल्यास तुम्ही अकाउंट विकू शकता. 'Famewap' शिवाय असे अनेक संकेतस्थळे आहेत, जिथे तुम्ही अकाउंट विकू शकता.