नवी दिल्ली : लॅँबोर्गिनीने ३०५ किमी प्रति तास या वेगाने धावणारी एसयूव्ही बाजारात आणली आहे.


लॅँबोर्गिनीची नवी कार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅँबोर्गिनी या जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनीने आपली सुपर लक्झरी एसयूव्ही "युरस" (URUS)बाजारात आणली आहे. अतिशय जबरदस्त लूक असलेल्या या गाडीची किंमत आहे ३ कोटी रुपये. भारतात मात्र फक्त २५ युनिटच विकण्याचा कंपनीचा इरादा आहे.


ताकदवान इंजिन


लॅँबोर्गिनीच्या या नव्या मॉडेलमध्ये ४.० लीटर ट्वीन टर्बो वी८ इंजिन आहे. त्याचबरोबर ६५० पीएस ची ताकद आणि ८५० एनएम चा टॉर्क हीसुद्धा याची वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच ही जगातली सर्वात वेगवान एसयूव्ही आहे. कारचा टॉप स्पीड तब्बल ३०५ किमी प्रति तास आहे.


पैसावसूल कार


ही कार फक्त ३.६ सेकंदामध्ये ०-१०० किमी प्रति तासाचा वेग धारण करते. कारमध्ये ऑफ रोड, सनो, सॅँड, रोड, ट्रॅक ड्राइविंग मोडची सुविधा दिलेली आहे. या कारची चाकं २३ इंच उंच आहेत. त्याशिवाय कारच्या हेडलॅंपला अतिशय आक्रमक लूक देण्यात आलाय. ३ कोटी रुपयांची ही कार स्पर्धेत इतरांच्या पुढेच आहे.