तुमच्या पासवर्डमध्ये हा अंक आणि ही अक्षरं असतील तर, एका संकदात होईल हॅक
Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते.
मुंबई : Weak Password: जग झपाट्याने डिजिटल होत आहे. डिजिटल क्रांतीच्या युगात लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची मदत घ्यावी लागते. आपण सर्व प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरतो, ज्यासाठी स्वतःचे स्वतंत्र खाते आणि पासवर्ड असावे लागते. त्यामुळे आपल्या खात्यांचे पासवर्ड अतिशय सुरक्षित असणे आवश्यक असते.
आरोग्य आणि आर्थिक डेटा
अनेक लोकं वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपल्या शॉपिंग आणि आरोग्या संदर्भात माहिती अपलोड करीत असतात. अशातच तुम्हाला पासवर्डबाबतची एखादी चूक महागात पडू शकते.
स्ट्रॉन्ग पासवर्ड आपल्या खात्याच्या सुरक्षित ठरतो. परंतू लोक अनेकदा हलगर्जी करतात आणि नंतर सायबर फसवणुकीला बळी पडतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या ऑनलाइन फसवणूकीचे बळी पडायचे नसेल तर कोणत्या पद्धतीचे पासवर्ड वापरू नयेत. हे आम्ही सांगणार आहोत.
हे पासवर्ड काही सेकंदात होतात हॅक
पासवर्ड व्यवस्थापन कंपनी Nordpass दरवर्षी त्या कमकुवत पासवर्डची यादी करते ज्यांना हॅक होण्यासाठी काही सेकंद लागतात. हे पासवर्ड हॅक करण्यासाठी ऑनलाइन गुंडांना जास्त वेळ लागत नाही.
123456
123456789
12345
qwerty
password
12345678
111111
123123
1234567890
1234567
आता तुम्हीही तुमच्या सोशल मीडिया खात्यासाठी किंवा ऑनलाइन बँकिंगसाठी असा पासवर्ड वापरला असेल, तर आजच आणि आता लगेच बदला. अन्यथा तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकता.
असा करा स्ट्रॉन्ग पासवर्ड तयार
पासवर्ड 8 अक्षरांपेक्षा जास्त असावा असा प्रयत्न करा.
पासवर्ड निवडताना अक्षर, अंक, सिम्बॉल्सचा सामावेश करा.
एका पेक्षा जास्त प्लॅटफॉर्मवर सारखा पासवर्ड वापरू नका