मुंबई : दसरा-दिवाळी आणि नवीन गोष्टींची खरेदी हे समीकरण अगदी घरबसल्या जमवून आणण्यासाठी सध्या अनेक ई कॉमर्स साईट्सवर धमाकेदार ऑफर्स सुरू आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये शिओमीचे स्मार्टफोन्स ट्रेन्डमध्ये आहेत. 


 ४८ तासांत शिओमीचे १० लाखाहून अधिक स्मार्टफोन विकले गेल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज आणि अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल दरम्यान ग्राहकांनी या शिओमीच्या स्मार्टफोन्सला विशेष पसंती दिली. दर मिनिटाला ३०० स्मार्टफोन्स खरेदी झाल्याची माहिती  त्यांनी दिली आहे. 


 कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये रेडमी नोट 4 हा स्मार्टफोन विक्रीच्या यादीमध्ये टॉपवर होता. रेडमी नोट4 वर १००० ते ४००० रूपयांपर्यतची सूट देण्यात आली आहे. 32 आणि 64  जीबीवाले दोन्ही फोन केवळ  १०,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहेत. 


 इतक्या झटपट स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री करणारी शिओमी ही  भारतातील पहिली कंपनी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या प्रतिसादाचे कंपनीनेदेखील कौतुक करत आभार मानले आहेत.