नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमीने स्मार्टफोन Redmi Go स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ ४४९९ रूपये इतकी आहे. या फोनला ५ इंची एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकम स्नॅपड्रॅगन ४२५ चीपसेटवर काम करतो. रियर कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सल देण्यात आला आहे. रेडमी गो स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड ८.१ ओरिओवर काम करतो. या स्मार्टफोनला ३००० mAh बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या २२ मार्चपासून या फोनची ऑनलाईन विक्री सुरू करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट आणि mi.com वर रेडमी गो २२ मार्चपासून खरेदी करता येऊ शकतो. 


जिओकडून या फोनच्या खरेदीवर शानदान ऑफर देण्यात आल्या आहेत. जिओने रेडमी गो खरेदी केल्यानंतर १०० जीबी डेटा आणि २२०० रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची ऑफर देण्यात आली आहे. 


https://pbs.twimg.com/media/D2AP4k9UwAA6Gkc.jpg


शाओमीने उत्तम फिचर्ससह आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. शाओमीने Redmi 6A हा स्मार्टफोन ५९९९ रूपयांत लॉन्च केला आहे. 'रेडमी-गो'च्या तुलनेत १५०० रूपये अधिक खर्च करून शाओमीने Redmi 6A हा स्मार्टफोन उपलब्ध करून दिला आहे. 


काय आहेत Redmi 6A ची वैशिष्ट्ये -


- Redmi 6A २ जीबी आणि ३ जीबी रॅममध्ये उपलब्ध
- ५.४५ इंची डिस्प्ले
- ७२०*१४४० पिक्सल रिजोल्यूशन
- ३००० mAh बॅटरी 
- १३ मेगापिक्सल रियर + ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- १६ जीबी इंटरनल मेमरी
- जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक


Redmi Go आणि Redmi 6A हे दोनही स्मार्टफोन फ्लिपकार्टवर EMI वर उपलब्ध आहेत. Redmi Go च्या खरेदीवर २४ महिन्यांसाठी २१९ रूपये दरमहा तर Redmi 6A च्या खरेदीवर ३४० रूपये २४ महिन्यांसाठी भरावे लागू शकतात.