मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आपला आणखीन एक स्मार्टफोन Redmi S2 लॉन्च केलाय. Redmi S2 हा स्मार्टफोन दिसण्यासाठी Mi6X सारखाच दिसतो... हा फोनदेखील या कंपनीनं नुकताच लॉन्च केला होता. Mi6X हा फोन भारतात MI A2 नावानं लॉन्च करण्यात आला होता. लवकरच  Redmi S2 हा फोनदेखील भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Redmi S2 या स्मार्टफोनमध्ये एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आलाय. हा एक बेजल लेस स्मार्टफोन आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आलाय. यामध्ये 4 जीबी रॅम तर 64 जीबी इंटरनल स्टोरेज कॅपेसिटी उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही मायक्रो एसडी कार्डही वापरू शकाल. 


रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि प्लॅटिनम सिल्वर अशा तीन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या फोनची बॅटरी 3080 mAhची आहे. मेटल यूनिबॉडी असणाऱ्या Redmi S2 मध्ये रिअर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलाय. 


फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युएल कॅमेरा देण्यात आलाय. यामध्ये एक लेन्स 12 मेगापिक्सल आहे तर दुसरी 5 मेगापिक्सल... सेल्फीसाठी यामध्ये एलईडी फ्लॅशसहीत 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये Android Oreo वर आधारित MIUI 9 देण्यात आलाय. 


Redmi S2 ची किंमत जवळपास 10,559 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 3 जीबी रॅमसोबत 32 जीबी इंटरनल मेमरी मिळेल. 


दुसऱ्या व्हेरिएन्टमध्ये 4 जीबी रॅमसोबत 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीय... आणि त्याची किंमत जवळपास 13,730 रुपये निर्धारित करण्यात आलीय.