फ्लिपकार्टवर शाओमी डे सेल; स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट
शाओमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
नवी दिल्ली : इ- कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट कंपनीने शाओमी डे सेलची सुरुवात केली आहे. शाओमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्लिपकार्टवर शाओमी कंपनीचा स्मार्टफोन खरेदी केल्यास मोठी सवलत मिळणार आहे. हा सेल २८ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीपर्यंत उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोन एक्स्चेंजवरही मोठी सूट देण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी इएमआयसारखी सुविधा दिली आहे.
शाओमी रेडमी ६
प्लिपकार्टवर रेडमी ६ स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट मिळणार आहे. शाओमी रेडमी ६ स्मार्टफोनची (३जीबी रॅम/ ३२ जीबी स्टोअरेज) किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. तर ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत रेडमी ६ या स्मार्टफोनवर ८ हजार ५०० रुपयांची मोठी सवलत मिळणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन केवळ ५०० रुपयांत खरेदी करता येणार आहे.
शाओमी रेडमी नोट ५ प्रो
शाओमी कंपनीचा हा स्मार्टफोन २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी नोट प्रो स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली होती. सध्या बाजारात रेडमी नोट ५ प्रो (४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोअरेज) स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तसेच ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोन १३ हजार ९९९ रुपये आहे. या सेल दरम्यान रेडमी नोट ५ प्रो स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सवलत देण्यात आली आहे. तसेच, एक्सचेंज ऑफरमध्ये हा स्मार्टफोन १२ हजार ६०० रुपयांत मिळणार आहे.
शाओमी नोट ६ प्रो
भारतात रेडमी नोट ६ प्रो हा स्मार्टफोन २०१८मध्ये लॉन्च करण्यात आला. रेडमी नोट ६ प्रो स्मार्टफोनची किंमत ( ४जीबी रॅम / ६४जीबी स्टोअरेज) १३ हजार रुपये आहे. ६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोअरेज असलेला स्मार्टफोन बाजारात १५ हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. परंतु या सेल दरम्यान हा स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनवर नो कॉस्ट इएमआय आणि एक्सचेंच ऑफर देण्यात आली आहे.
शाओमी पोको एफ वन
शाओमी पोको एफ वन स्मार्टफोन २० हजार ९९९ रुपयात लॉन्च करण्यात आला होता. सध्या बाजारात हा स्मार्टफोन १९ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या शाओमी डे सेल दरम्यान या स्मार्टफोनवर १ हजार रुपयांची सूट दिली आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनवर नो कॉस्ट इएमआय आणि एक्सचेंच ऑफर देण्यात आली आहे.