भारतात Xiaomi Mi Max 2 मोबाईलवर सूट
तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर शिओमी MiMax2 आणि त्यावर सुरू असलेली सूट तुमच्यासाठी उत्तम बजेटफोनचा एक पर्याय आहे.
मुंबई : तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर शिओमी MiMax2 आणि त्यावर सुरू असलेली सूट तुमच्यासाठी उत्तम बजेटफोनचा एक पर्याय आहे.
भारतामध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबी अशा दोन पर्यायांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. अनुक्रमे त्यांची किंमत १३,९९९ आणि १५,९९९ इतकी आहे. शिओमीने या फोनच्या किंमतींमध्ये हजार रूपयांची सूट दिली आहे. तसेच फ्लिपकार्टवर फोन एक्सचेंज केल्यास १५,००० पर्यंतची सूट देण्यात आली आहे.
शिओमीचे व्हाईस प्रेसिंडेंट आणि शिओमी इंडियाचे एमडी मनू कुमार जैन यांनी याबाबत ट्विट केले आहे.
शिओमी MiMax2 चे फीचर्स
6.44 स्क्रिन
४जीबी रॅम
६४ जीबी ऑनबोर्ड मेमरी (१२८ जीबीपर्यंत ) एक्सपान्डेबल
2.5D कर्व्हड ग्लास स्क्रीन
५ एमपी कॅमेरा
ईअरपीसवर लाईट सेंसर
फिंगर प्रिंट सेंसर
या फोनची मासिव्ह बॅटरी ही युएसपी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या बॅटरीचा ३१ दिवसांचा स्टॅडबाय टाईम आणि ५७ तासांचा टॉकटाईम आहे.
तासभर फोन चार्ज केल्यानंतर सुमारे ६८ % चार्जिंग होत असल्याचा दावाही फोन कंपनीने केला आहे.