नवी दिल्ली : शाओमी कंपनीचा Mi Mix 2S हा स्मार्टफोन कंपनीचा सर्वात चांगला आणि इनोवेटिव्ह स्मार्टफोन आहे. २७ मार्च रोजी हा फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र, फोन लॉन्च करण्यापूर्वीच कंपनीचे सीईओ ली जून यांनी एक मोठा खुलासा केला आहे.


सिरॅमिक बॉडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया वेबसाईट वीबो वर ली जून यांनी म्हटलं आहे की, Mi MIX 2S या स्मार्टफोनमध्ये सिरॅमिक बॉडी असणार आहे. तसेच 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंट मॉडल लॉन्च करण्यात येणार आहे.


लॉन्चिंग तारखेला दुजोरा


वीबो वर आपल्या पोस्टच्या माध्यमातून ली जून यांनी Mi MIX 2S या स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट २७ मार्च असल्याचं म्हटलं आहे. चीनमधील एका कार्यक्रमात या फोनचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे.


असे आहेत फिचर्स


ली जून यांनी आपल्या पोस्टमध्ये स्मार्टफोनचे काही खास फिचर्सचा खुलासा करत म्हटलं आहे की, स्नॅपड्रॅगन 845 SoC, 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आला आहे.


Mi MIX 2S या फोनचा लीक झालेल्या 6 सेकंदांचा टीझर समोर आला आहे. यामध्ये सिरॅमिक बॉडी, वर्टिकल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हे फिचर आतापर्यंत वीवो X21 आणि वीवो X20 प्लस UD मध्ये देण्यात आलं आहे.