लवकरच येतोय Redmi 4 चा अपग्रेडेड फोन, पाहा काय आहेत फिचर्स
तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
रेडमी 4 च्या यशस्वी विक्रीनंतर कंपनीने आता नवा हँडसेट भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी पूर्ण केलीय.
'या' तारखेला होणार लॉन्च
Xiaomi Redmi 5 हा फोन कंपनीतर्फे 14 मार्च रोजी लाँन्च करण्यात येणार आहे. हा फोन Xiaomi Redmi 4 चं अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे.
7 मार्चला फोनचा टीझर प्रदर्शित
ट्विटरवर या नव्या स्मार्टफोन्सचे फोटोज ट्रेंड करत आहेत. कंपनीने 7 मार्च रोजी या फोनचा टीझर प्रदर्शित केला होता.
शाओमी कंपनीतर्फे रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो हे दोन स्मार्टफोन्स नुकतेच लाँन्च करण्यात आले आहेत. शाओमीने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात रेडमी 5 आणि रेडमी 5 प्लस हे फोन्स चीनमध्ये लाँन्च केले होते. या दोन्ही फोन्सला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Xiaomi Redmi 5 चे फिचर्स
1 - Xiaomi Redmi 5 चा नवा फोन 'कॉम्पॅक्ट पावरहाउस' च्या समान असणार आहे.
2 - या फोनमध्ये 5.7 इंचाचा फुल HD प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
3 - या फोनचा डिस्प्ले रेश्यो 18:9 आहे
4 - हा MIUI 9 सिस्टमवर आधारित नूगा 7.1 वर काम करणारा फोन आहे.
5 - फोनला पावर देण्यासाठी रेडमी 5 स्मार्टफोनमध्ये स्नैपड्रैगन 450 प्रोसेसर देण्यात आला आहे.
6 - या फोनचा कॅमेरा 12 मेगापिक्सल आहे.
7 - सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
8 - या फोनमध्ये रियर कॅमऱ्यासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.
9 - फ्रँट कॅमऱ्यात ब्यूटीफाई 3.0 फिचर देण्यात आलं आहे
10 - फोनमध्ये ड्युअल सिम वापरता येणार आहे.
11 - फोनची बॅटरी पॉवर 3300mAH आहे.
12 - हा फोन एंड्रॉयड नूगा आउट ऑफ द बॉक्स वर चालतो.