मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने अवघ्या एका महिन्यात आपल्या नव्या स्मार्टफोनची जोरदार विक्री करत नवा विक्रम रचलाय. कंपनीचा असा दावा आहे की एका महिन्यात कंपनीचे रेडमी 5A हे स्मार्टफोन १० लाखाहून अधिक विकले गेलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन म्हणाले, आम्हाला हे सांगताना आनंद होतोय की महिन्याभरात शाओमीच्या रेडमी 5Aचे १० लाखाहून अधिक स्मार्टफोन विकले गेलेत. शाओमीला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. 


स्मार्टफोनचे फीचर्स


क्वाडकोर क्वॉलकॉम ४२५ प्रोसेसर 
५ इंचाचा डिस्प्ले
२जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत  5,999 रुपये
३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3000 एमएएच बॅटरी