रेडमी 5A चं नवं व्हेरिएंट बाजारात ! किंमत पाहून हैराण व्हाल
शिओमीच्या फोनची क्रेझ गेली अनेक महिने भारतामध्ये आहे.
मुंबई : शिओमीच्या फोनची क्रेझ गेली अनेक महिने भारतामध्ये आहे.
शिओमीने रेडमी 5A मध्ये आज व्हेरिएंड लॉन्च केला आहे. फ्लिपकार्टवर हा नवा मोबाईल ग्राहकांसाठी खुला करण्यात आला आहे. शिओमी रेडमी 5A हा डार्क ग्रे,गोल्ड अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होता. नोव्हेंबरमध्ये या हॅन्डसेटची किंमत 5999 रूप्ये होती. मात्र आता यामध्ये अजून एक नवा मोबाईल आणला आहे.
ट्विटरद्वारा माहिती
बुधावारी कंपनीने ट्विटरच्या अधिकृत हॅन्डलवरून नव्या रोज गोल्ड व्हेरिएंटची माहिती दिली आहे.
फ्लिपकार्टवर माहिती
फ्लिपकार्ट या आघाडीच्या ई कॉमर्स साईटवरही शिओमीच्या या नव्या मोबाईल व्हेरिएंटची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'व्हेलन्टाईन डे' ची संधी साधत गुलाबी रंगात हा मोबाईल लॉन्च करण्यात आला आहे.
फीचर्स काय ?
ड्युएल सिमची सुविधा
5 इंच HD डिस्प्ले
क्वाड-कोर क्वालकॉम 425 प्रोसेसर (1.4 गीगाहर्ट्स)
16GB मेमरी, 2GB रॅम
माइक्रोएसडी कार्डद्वारा मेमरी 128 GB पर्यंत वाढवली जाईल.
13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
ड्रॉयड नूगा बेस्ड Mi 9 ऑपरेटिंग सिस्टम
3.5 एमएम ऑडियो जॅक
3000 mAh पावर बॅटरी
हॅन्डसेटचे डाइमेंशन 140.4x70.1x8.35mm-
हॅन्डसेटचे वजन 137 ग्राम