मुंबई : शिओमी (Xiaomi) या चायनीज स्मार्टफोनची ग्राहकांमध्ये क्रेझ वाढते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता शिओमी रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो हे नवे स्मार्टफोन्स बाजारात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. याकरिता शिओमी दुसर्‍यांदा सेल्सचे आयोजन करणार आहेत. 


ट्विटरद्वारा माहिती 


शिओमीच्या वेबसाईटवर आणि फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजल्यापासून या खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. शिओमी  इंडियाचे एम डी मनु कुमार जैन याबाबतचे ट्विट केले आहे. 


 



कसा कसेल रेडमी नोट 5 ?  


रेडमी नोट 5 हा मोबाईल सगळ्यात स्लीम आहे. 
डिस्पे -  5.99 इंच 
रंग - लेक ब्लू, रोझ गोल्ड, काळा, सोनेरी 
कॅमेरा - रेडमी नोट 5 मध्ये 12 MP  रेअर कॅमेरा आहे. 1.25um पिक्सेल साईझ आणि  5MP फ्रंट कॅमेरा आहे. सोबतच मोबाईलमध्ये एलईडी फ्लॅश आहे. 
रेडमी नोट 5 मध्ये 625 Snapdragon प्रोसेसर आहे. 
किंमत - 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 आहे. तर 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेजच्या मोबाईलची किंमत  11,999 रूपये आहे.  


खास वैशिष्ट्य - 


रेडमी नोट 5 प्रो या फोनमध्ये पहिल्यांदा फेस अनलॉक करण्याचे फीचर आहे. Redmi Note5 Pro या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 636 प्रोसेसर सोबत 6 जीबी रॅम असे कॉम्बिनेशन पहिल्यांदा आले आहे. 20MP सेल्फी कॅमेर्‍यासोबत एलईडी फ्लॅशदेखील आहे.  


4GB RAM आणि 64GB storage असलेल्या रेडमी नोट 5 प्रो ची किंमत 13,999 रूपये  आहे. तर 6GB RAM आणि 64GB ROM 
असलेल्या मोबाईलची किंमत 16,999  रूपये आहे.