Yamaha RX100 To Launch Soon: यामाहाच्या RX100 बाइकबाबत आजही क्रेझ कायम आहे. 90 च्या दशकात या बाइकने तरुणाईवर भुरळ घातली होती. आजही या बाइकचे अनेक चाहते आहेत. ही बाइक 1985 पासून 1996 पर्यंत उत्पादनात होती. त्यानंतर या बाइकचं उत्पादन बंद करण्यात आली. ही बाइक पुन्हा एकदा येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामाहा इंडियाचे अध्यक्ष इशिन चिहाना यांनी एका न्यूज वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, यामाहा भविष्यासाठी योजना आखत असताना आतापर्यंत कोणत्याही उत्पादनावर प्रतिष्ठित RX100 मोनिकर वापरलेले नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर RX100 परत येऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. पण जुनी Yamaha RX100 परत रस्त्यावर धावू शकणार नाही. कारण ही गाडी टू-स्ट्रोक इंजिनवर आधारित होती. त्यामुळे कठोर BS6 उत्सर्जन मानदंडांची पूर्तता करू शकत नाही. अशा स्थितीत त्याचे इंजिन बदलले जाऊ शकते. डिझाइन देखील अपडेट केले जाऊ शकते.


यामाहा इंडियासमोर आव्हान आहे की, कोणत्याही बाइकवर RX100 बॅज देऊ शकत नाही. कारण RX100 ही एक लीजेंड बाईक आहे आणि नवीन RX100 साठी, कंपनीला नवीन तत्सम बाईक तयार करावी लागेल. यासाठी, कंपनी जुन्या मॉडेलवर पाणी सोडून रेट्रो डिझाइनचे संयोजन आणू शकते. यामाहा इंडियासाठी हे खूप मोठे आव्हान असणार आहे.


तथापि, RX100 पुन्हा लॉन्च होण्याची वाट पाहणाऱ्या लोकांची प्रतीक्षा लवकरच संपणार नाही. रिपोर्ट्सनुसार, जर Yamaha RX100 कंपनी 2026 पर्यंत आणू शकते. सध्या, यामाहाच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त 125 सीसी स्कूटर, 150 सीसी स्ट्रीट आणि स्पोर्ट मोटरसायकल आणि 250 सीसी स्ट्रीट बाईक आहेत.