Yamaha Tmax Modification: लोकप्रिय दुचाकी कंपनी यामाहा (Yamaha) भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये बाइक आणि स्कूटर विकते. कंपनीने 2000 मध्ये Yamaha TMAX नावाची स्कूटर बाजारात आणली होती. ही स्कूटर तिच्या डिझाइनमुळे चर्चेत होती. या स्कूटरला मॅक्सी-स्कूटर्सचे डिझाइन देण्यात आले होते. कंपनी अजूनही युरोपियन बाजारपेठेत त्याची विक्री करत आहे. आता फ्रान्समधील ऑर्टोलानी कस्टम्स (Ortolani Customs) या वर्कशॉपने या स्कूटरसा आकर्षक डिझाईनमध्ये सादर केली आहे. ही स्कूटर पाहून तुम्हाला स्पोर्ट्स बाईक आहे असंच वाटेल. कस्टमायझेशननंतर या स्कूटरला 'टायटन' असे नाव देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कूटरचे फोटो पाहून तुम्हीही खूश व्हाल. स्कूटरला आकर्षक लूक आणि त्याची कार्यक्षमता देखील सुधारली गेली आहे. कस्टमाइज Yamaha Tmax मधून प्लास्टिक बॉडीवर्क वगळण्यात आले आहे. त्याऐवजी स्कूटरमध्ये अॅल्युमिनियमपासून बनवलेले हँडमेड पॅनल्स लावण्यात आले आहेत. ही स्कूटर यामाहा R1 सारखी दिसते. यात ड्युअल टोन थीम आहे.



मॉडिफाइड स्कूटरला 17-इंचाची चाकं असून Aprilia RSV4 कडून घेतली आहेत. चाकं बदलण्यासोबतच ABS सोबत ब्रेकिंग देखील अपग्रेड करण्यात आले आहे. इंजिनची शक्ती देखील 50hp पेक्षा जास्त वाढली आहे, जी पूर्वी 47hp होती.