आता एकाच फोनमध्ये अॅक्टीव्ह करा तीनपेक्षा जास्त सिम..ही बातमी एकदा वाचाच...
ही बातमी तुम्हाला दिशाभूल करणारी वाटेल पण प्रत्यक्षात ती खरी आहे.
तुमच्या फोनमध्ये ई-सिम सेवा असल्यास, तुम्ही एकाच फोनमध्ये तीनपेक्षा जास्त सिम अॅक्टीव्ह करू शकता. ही टेक्नीक कसं कार्य करते ते समजून घेऊया
टेक्नॉलॉजी झपाट्याने प्रगती करत आहे, पूर्वी एका फोनमध्ये एकच सिम असायचं आणि आज तंत्रज्ञानाचा विस्तार इतका झाला आहे की एका फोनमध्ये दोन सिम वापरु शकतो. त्याचवेळी, आता सिम टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान ई-सिममध्ये बदलले जात आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की एका फोनमध्ये तुम्ही आता 5 पर्यंत सिम किंवा फोन नंबर चालवू शकता.
ही बातमी तुम्हाला दिशाभूल करणारी वाटेल पण प्रत्यक्षात ती खरी आहे.
अधिक सिम असलेलं तंत्रज्ञान ई-सिमद्वारे देखील केले जाऊ शकतं. ई-सिम वापरकर्ते सिम न घालता सेवा वापरू शकतात.आजकाल अनेक फोनमध्ये ई-सिम चालू आहे. त्याच वेळी, फोन तुटल्यास किंवा ओला झाल्यास सिमवर परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रिलायन्स जिओचे वापरकर्ते असाल तर तुम्ही हे सिम जवळच्या कोणत्याही जिओ स्टोअरमधून घेऊ शकता
Reliance Jio e-SIM चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Reliance Digital किंवा Jio Store वर जावे लागेल.
नवीन जिओ ई-सिम कनेक्शन सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एक अॅप डाउनलोड करावं लागेल. तर eSIM कंपॅटिबल डिव्हाइस हे सिम आपोआप कॉन्फिगर करतात. जर तुम्ही डाउनलोड केलेले eSIM चुकून डिलीट केले तर तुम्हाला ते पुन्हा Jio Store वर जाऊन पुन्हा अॅक्टिव्ह करावं लागेल.
ई-सिमला सपोर्ट करणार्या उपकरणांमध्ये तुम्ही एकाच वेळी अनेक ई-सिम चालवू शकता, विशेषत: आयफोन. उदाहरणार्थ, फिजिकल स्लॉटमध्ये तुम्ही एक सिम वापरू शकता, तर इतर व्हर्च्युअल ई-सिम स्लॉटमध्ये तुम्ही एकाधिक ई-सिम जोडू शकता एका वेळी फक्त एकच ई-सिम कार्य करेल, जे आपण हवं तेव्हा स्विच करू शकता.
Jio वेबसाइटनुसार, तुम्ही एका डिव्हाइसमध्ये एकाधिक eSIM प्रोफाइल तयार करू शकता, परंतु एका डिव्हाइसमध्ये केवळ 3 e-SIM चालवू शकता. अशा परिस्थितीत, या ई-सिमच्या तंत्रज्ञानाद्वारे, आपण एकाच फोनमध्ये तीनपेक्षा जास्त सिम सहजपणे अॅक्टीव्ह करू शकता आणि ते चालवू शकता.