मुंबई : देशात गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजेच GST लागू झाल्यानंतर आता त्यामध्ये अनेक गोष्टींच्या किंमती बदलणार आहेत. कोणत्या वस्तूंच्या किंमती बदलणार याबाबत अनेकांच्या मनात अजूनही शंका आहे. अशातच मोबाईल रिचार्जवर मिळणाऱ्या टॉकटाईममध्ये देखील बदल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी दूरसंचार सेवांवर 15% टॅक्स लागत होता आता तो टॅक्स १८ टक्क्यावर गेला आहे. यामध्ये पोस्टपेड आणि प्री-पेड यूजर्सला आता ३ टक्के अधिक टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजेच आता 100 रुपयाच्या रिचार्जवर 82 रुपये टॉकटाईम मिळणार आहे.


टॅक्स रेटनुसार जर तुम्ही एक पोस्टपेड यूजर आहात तर आणि जर तुम्हाला 500 रुपये बिल येत असेल तर त्यावर तुम्हाला 18 टक्के टॅक्स लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला 590 रुपये बिल येणार आहे.


प्री-पेड यूजर्ससाठी जर तुम्ही 100 रुपयाचं टॉपअप वाउचरने रिचार्ज केलं तर तुम्हाला 82 रुपये मिळतील. जीएसटी लागू होण्याआधी तुम्हाला 85 रुपये मिळत होते.